चिमुर क्रांती जिल्हा घोषीत करावा – एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

23

🔸ना. विजय वडेट्टीवार यांनी आस्थेने वाचले निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.19ऑगस्ट):-आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झालेली आहे. ते स्वतंत्र मिळविण्यासाठी चिमूर शहराची फार मोलाची भुमिका आहे. कित्येक स्वातंत्र संग्राम सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. संपूर्ण भारत देश स्वातंत्र होण्यापूर्वीच चिमूर हे शहर १६ ऑगस्ट १९४२ ला स्वातंत्र झाले होते. स्वतंत्र लढाची सुरुवात ही सर्वप्रथम चिमूर शहरातूनच झालेली आहे. या शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन चिमुर क्रांती जिल्हा घोषीत करावा अशी मागणी समाजसेवक, संपादक केशवराव वरखेडे यांनी चिमुरचे एसडीओ मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना चिमूर येथे शाहिदाना श्रद्धांजली देण्याकरिता चिमुरात आले असता दिलेल्या निवेदनातून केली आहे.

चिमूरपासुन भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपुर, वर्धा, गडचिरोली आदी जिल्हे हे १०० किमी अंतरावर आहे. चिमूर हे विधानसभा, लोकसभा क्षेत्र आहे. चिमूर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्प आहे. चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा आठ्ळतो. चिमूर तालुका हे वनसंपदेणे नटलेले आहे. चिमूर तालुका हे रामदेगी, मुक्ताबाई, सातबहिनी, झरी (नवतला) आदी धबधबा असलेली निसर्गरम्य तथा धार्मिक ठिकाणे आहेत. तसेच भिसी, चिमूर, नेरी या ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे आहेत. चिमुर क्रांती जिल्हा घोषीत करावा अशी मागणी मागील ३० ते ४० वर्षापासुन सुरु आहे.

निवेदन सादर करण्या-या शिष्टमंडळात समाजसेवक, संपादक केशवराव वरखेडे यांचेसह आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. संजय पिठाळे, समाजसेवक, ग्रंथमित्र तथा मानवाधिकार स्वायत्ता संस्थांचे तालुकाध्यक्ष सुभाष शेषकर, सामाजिक युवा कार्यकर्ता केमदेव वाडगुरे, चिमूर तालुका प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, पत्रकार भरत बंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.