प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांच्यासह ६ पदाधिकारी समाजरत्न पत्रकार पुरस्काराने सन्मानित

21

✒️लातूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लातूर(दि.20ऑगस्ट):-लातूर येथील राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत रक्तदान हेच जीवन दान ग्रुपच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा सुवर्णयुगचे संपादक लहूकुमार शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, युवाध्यक्ष सुनील कांबळे, उपाध्यक्ष रवी बिजलवाड, जळकोट ता. अध्यक्ष महादेव होनराव, नामदेव केंद्रे, राजाबाई पुजारी यांना समाजरत्न पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा शानदार सोहळा ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष्मण देशमुख, वैद्यकीय अधिकारी संतोषकुमार डोपे, शिवशाहीर संतोष साळुंके, दै. समीक्षाचे संपादक रामेश्वर धुमाळ, संध्या जैन, कल्पना काटकर यांच्या शुभहस्ते समाजरत्न पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांनी बातमीच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव, कोषाध्यक्ष विशाल देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी मोठी मेहनत घेतली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुर्यवंशी यांनी तर आभार विशाल देवकते आणि मांनले. या कार्यक्रमास अनेक पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सन्मानाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,नवनाथ गायकर, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, महिलाध्यक्षा वैशाली हिंगोले, लातूर जिल्हा संघटक संजय राजुळे, संपर्क प्रमुख नितीन भाले, महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, सर्व राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकाकाऱ्यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.