अविनाश साबळे पुढील स्पर्धेत जिंकून मांडवा गावचे नाव देशपातळीवर झळकणार – सरपंच अशोक मुटकुळे

33

🔸ऑलिम्पिक खेळाडू अविनाश साबळेंच्या मांडवा गावातील ग्रामस्थांनी केला सत्कार

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.4सप्टेंबर):-तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी असलेला ऑलिंपिक खेळाडू अविनाश मुकूंद साबळे यांचा ग्रामस्थांनी सत्काराचे आयोजन शुक्रवार दि.४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.त्याने टोकिओ जपान ऑलिंपिक स्पर्धेत स्टीपलचेस (अँथलेटिक्स) प्रकारांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.देशाचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला ते पुढील स्पर्धेत जिंकून मांडवा गावचे नाव देशपातळीवर झळकणार असल्याचे खात्री सरपंच अशोक मुटकुळे यांनी सत्कार कार्यक्रमात बोलताना केली आहे.सवतःच्या मूळ मांडवा गावांतील ऑलिंपिक खेळाडू अविनाश साबळे यांचे मांडवा येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण धानोरा,कडा येथे घेतले होते.त्यांच्या सत्काराचे जंगी स्वागताचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते.

अविनाश बोलताना म्हणाले की,ऑलिंपिकचे एक काय अनेक पदके आपल्या देशाला मिळू शकतात.माझ्या खेळाचा सराव आणखी थांबवलेला नाही.२०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी मी रात्रं-दिवस सराव करत आहे.माझ्या गावच्या ग्रामस्थांनी जो सन्मान करून सत्कार केला त्यांचा मी मनापासून आभारी आहे.पुढे बोलताना सरपंच अशोक मुटकुळे यांनी म्हटले की,आपल्या छोट्याशा माडवा गाव सारख्या खेड्यात जन्म घेऊन अविनाश साबळे यांनी ऑलिंपिक स्पर्धेत स्टीपलचेस खेळामध्ये सातवा क्रमांक मिळवला आहे.ही मोठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे.

टोकियो येथील स्पर्धेत साबळेंना मेडल मिळाले नाही तरी २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत नक्कीच मेडल मिळेल आणि आपल्या मांडवा गावाचे देशपातळीवर नाव उज्वल करणार असल्याची अपेक्षा आहे.त्यासाठी अविनाशने भरपूर सराव,मेहनत,चिकाटी व जिद्द असणे गरजेचे आहे असे उदगार सरपंच मुटकुळे यांनी बोलताना केले.यावेळी उपसरपंच युवराज मुटकुळे,रावसाहेब मुटकुळे,अनिल मुटकुळे,भगवान श्रीखंडे,अश्वमेद मुटकुळे,संतोष मुटकुळे,योगेश कदम,धनेश मुटकुळे,शरद पवार,योगेश मुटकुळे,मुख्याध्यापक सोनवणे,सचिन मुटकुळे,श्रीधर मुटकुळे, ग्रामसेवक जुगधर,लक्ष्मण वीर,अमृत मुटकुळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.