जान्हवी सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन सस्तेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा

🔸प्रथम वर्धापन दिनानिमित्त सह्याद्री हाॅस्पिटल पुणे यांचे मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

✒️फलटण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

फलटण(दि.४ऑगस्ट):- जान्हवी सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन सस्तेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी मोफत तज्ञ डाॅक्टरांमार्फत मोफत वैद्यकीय तपासणी, स्तनांची व गर्भाशयमुखाची तपासणी, निदान चाचणी तसेच पुढे उपचार लागल्यास योग्य सल्ला असे कर्करोग पुर्वनिदानचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा मध्ये प्रमुख उपस्थिती शबाना पठाण(सुवर्ण स्पर्श फाउंडेशन), अनिता काळे(अपंग जिव्हाळा संस्था), अॅड. वर्षाताई देशपांडे (सामाजिक कार्यकर्त्या), पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोंबरे , सरपंच ज्ञानेश्वरी कदम, उपसरपंच बापुराव शिरतोडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील वाबळे, प्रताप सस्ते, प्रियंका भाऊसो सस्ते,तंटामुक्ती अध्यक्ष सतिष सस्ते, सोसायटी सदस्य सुधाकर कदम, सोसायटी चेअरमन चंद्रकांत सुर्यवंशी , आत्माराम सस्ते, अविनाश धुमाळ पाटिल, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षाताई देशपांडे यांनी महीलांच्या अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केले विशेषतः महीला व पुरुष यांच्या संयुक्त घरमालकी या संदर्भात स्त्रीयांना पुढाकार घेण्यास प्रेरित केले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या महीला कर्करोग तपासणी व निदान या संदर्भात सुमारे ८०-१०० महीलांनी लाभ घेतला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED