प्रतिकूल परिस्थितीत गजानन खंडागळे ने नेमबाजीत पटकावले सुवर्ण पदक

🔸संत रविदास प्रतिष्ठान व त्वरिता अर्बन बँक निधी लि.परिवाराकडून सत्कार

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.11सप्टेंबर):-महाराष्ट्र एअर गण फायर आमर्स कॉम्पिटीशयन खडकी पुणे येथे झालेल्या स्टेट लेव्हल 2021 च्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर येऊन सुवर्ण पदक मिळवत,प्रि नॅशनल पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला तलवादा येथील युवक गजानन खंडागळे याने घवघवीत यश संपादन करून तलवाडा गावासह जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात झळकावले त्याने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संपादन केले असून पुढे ही गजानन खंडागळे हे गावाचे नाव उज्वल करतील असे मत त्वरिता अर्बन बँकेचे चेअरमन विजय डोंगरे सर तसेच संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे यांनी गजानन खंडागळे यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी असलेले शहादेव खंडागळे हे बूट चप्पल चा व्यवसाय करत हातावर मजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात कुटुंबातील परिस्थितीची जाणीव ठेवत त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यात कधीही परिस्थिती समोर समझोता केला नाही .मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आग्रही राहून त्यांना शिक्षण दिले.मुलगा गजानन खंडागळे चा जन्म याच कुटुंबात झाला असून आपले शिक्षण पूर्ण करता करता क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करणे त्याने पसंद केले.2019 पासून या क्षेत्रात आपल्या ध्येयाला सुरुवात करून नेमबाजीत दोन सुवर्ण पदक व एक सिल्व्हर पदक मिळवले.मागील महिनायत खडकी पुणे याठिकाणी झालेल्या महाराष्ट्र एअर गण फायर आमर्स कॉम्पिटीशीयन या स्टेट लेवल च्या स्पर्धेत त्याने महाराष्ट्रात पथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवून दिले असून पुढे होणाऱ्या प्रि नॅशनल पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी गजानन खंडागळे याची निवड झाली आहे. यात्याच्या यशाबद्दल तलवाडा येथे 10 सप्टेंबर रोजी समाज कल्याण चे माजी सभापती गीताराम डोंगरे तसेच शिवसेनेचे गट नेते गोविंद जोशी व त्याच्या सहकारी यांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

त्याच बरोबर 11 सप्टेंबर रोजी संत रविदास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे तसेच त्वरिता अर्बन चे चेअरमन विजय डोंगरे सर यांनी सत्कार कार्यक्रम आयोजित करून गजानन ला शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज तात्या डोंगरे,तलवाडा गावचे सरपंच विष्णू तात्या हात्ते,उपसरपंच आज्जूशेठ सौदागर, माजी पंचायत सदस्य बाबासाहेब आठवले,साहेबराव कुर्हाडे,पत्रकार बापू गाडेकर,सुभाष शिंदे,अल्ताफ कुरेशी,विष्णू राठोड, दत्ता भाऊ हाते,सचिन नारकर, एकनाथ नारकर,विनोद दादा जगताप,विष्णू नारकर, ग्रामपंचायत सदस्य पिंटूशेठ गर्जे,शहादेव साबळे,फकिरा नाना हातागळे, बँकेचे सावता शिंगणे सर,पवार सर,खाडे सर,राठोड बंधू,पत्रकार विष्णु राठोड, प्रतिष्ठान चे पदाधिकारी शेषेराव पोटे,ब्रम्हा वाघमारे,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गांधले,महादेव वाघमारे,राजाराम खंडागळे,सुनील गोरे,गणेश पोटे,नाथा कावळे सर,किशोर गांधले,तुषार गांधले,बाबा गोरे, पंढरी उनवणे,दत्ता एडके,यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
=======================
चौकट
गजानन ला समाजातील दानशूरव्यक्ती कडून आर्थिक मदतीची गरज

गजानन खंडागळे हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा आहे,वडील चप्पल-बूट चा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात आणि पोटाला चिमटे घेत गजानन च्या शिक्षनासाठी पैसे पुरवतात.शेतजमीन वा इतर कोणतेच आर्थिक उन्नतीचे साधन नसून सर्वकाही हातावर असून अनेक अडचणी ला समोरे जात ते गजानन ला शिकवत आहेत,परंतु आता ते हतबल झाले असून गजानन च्या सरावासाठी एअर गण घायला आणि प्रशिक्षकाचे मानधन द्यायला ही त्यांच्याकडे आर्थिक शोर्षं नाही.त्यामुळे त्यांना मुलाच्या भविष्याची चिंता वाटू लागली असून मुलाच्या क्रीडा क्षेत्रातील कला गुणांना वाव मिळावा म्हणून समाजातील दानशूर बांधवानी,नेत्यांनी,पदाधिकारी यांनी मदत करावी ही भावना मुलाच्या सत्कार प्रसंगी बोलून दाखवत भावनिक साद घातली.यावेळी युवराज तात्या डोंगरे,सरपंच विष्णू तात्या हात्ते,दत्तभाऊ हात्ते, विजय डोंगरे सर व तुळशीराम वाघमारे यांच्या सह गजानन यांना धीर देत मदत देऊ अशे सांगितले तसेच गावातील व तालुक्यातील त्याच बरोबर सर्वांनी मदत करावी असे आवाहन केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED