कुंडलवाडीत गणेशोत्सव व दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभुमिवर पोलीसांचे पथसंचलन…

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.11सप्टेंबर):-शहरातील गणेशोत्सव व दुर्गाच्या उत्सवच्या पार्श्वभुम्वर शांतता व सुव्यवस्था आबादीत ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्याने धर्माबादचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक करीमखॉ पठाण व पोलीस उपनिरीक्ष विशाल सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कुंडलवाडी शहरात पोलीसांचे पथसंचालन करण्यात आले.14 पोलीस कर्मचा-यासह 20 होमगार्डचे जवान आर.सी.पी. राईट कंट्रोल पोलीस ओ वन फलटून पार्टी सहभागी झाले होते.गणेश व दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभुमिवर शहरासह परीसरात शांतता राहवी.

यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.याचाच एक भाग म्हणुन शहरातील प्रमुख रस्त्यावर पोलीसांनी सहायक पोलीस निरीक्षर करीमखॉ पठाण व पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले.या पथसंचलनात शंकर चव्हाण,भालेराव,पचलिंग,भालेराव,राम आडे,गजानन अनमुलवार,दिलीप जाधव,संजय चापलवार,नागेद्र कांबळे,तैनात बेग,कमलाकर,इद्रीस बेग,महेश माकुरवार,अलीमोद्दीन शेख, गंधकवाड यांच्यासह महीला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED