मैत्रा फाऊंडेशनचे शिक्षण महर्षी पुरस्कार जाहीर

39

🔹भास्कर ढवळे सरांना समाजरत्न पुरस्कार

✒️बीड,विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.21सप्टेंबर):-मैत्रा फौंडेशनच्या शिक्षण महर्षी पुरस्कारांचे लवकरच वितरण केले जाणार आहे.नुकतेच मैत्रा फाउंडेशनची बैठक होऊन प्राप्त प्रस्तावांपैकी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षण महर्षी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यासाठी निवड करण्यात आली.पुढील व्यक्ती शिक्षकांचा मैत्रा फाउंडेशन मार्फत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

 यामध्ये संगीता आदमाने,प्रा.राजेंद्र गाडेकर,गोरक्षनााथ लाड,प्रवीण एडके(अहमदनगर),सुभद्रा खेडकर,शिवाजी दत्तात्रय झेंडेकर,आगळे आत्माराम,शेख मुनव्वर सुलताना,अनुपमा जाधव (पालघर),सुभाष शिंदे(सांगली),मोहोळ मनिषा(उस्मानाबाद),बांगर सुरेखा (पालवण),तीलोत्तमा पतकराव,सुवर्णा सुतार,राजश्री ताई मिसाळ – ढाकणे,नितीन वाघमारे सांगली,कैलास गायकवाड (सांगली),जयश्री औताडे(परभणी),अरविंद राऊत,गाजरे लहू(पुणे),युवराज जगताप (सोलापूर),बाळासाहेब सोनसळे,चव्हाण केदारनाथ,धन्वे बाप्पू रामभाऊ,जगताप सुनिता,सलाउद्दीन सय्यद,प्रणाली कोल्हे(वर्धा),चंद्रकांत खोसे(नवी मुंबई),राठोड शिवदास,राठोड अर्जुन,हाडुळे अजिनाथ,ठोंबरे भारत,पदमिन हंगे यांचा समावेश असून त्यांना शिक्षण महर्षी तर समाज सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले शिक्षक भास्कर ढवळे यांना फाउंडेशनच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

अशी माहिती मैत्रा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द.ल.वारे आणि जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.निवड झालेल्या शिक्षकांचे फाउंडेशनच्या सचिव सौ.हर्षा ढाकणे,उपाध्यक्षा सौ.शितल बळे,संस्थापक सदस्य उज्वला वनवे,सरिता नाईकवाडे,माधुरी कोटुळे,शैलजा बोबडे यांनी अभिनंदन केले आहे.