दलित अत्याचार निर्मुलन समितीच्या बॅनरखाली सर्वपक्षीय आंबेडकरी संघटनांचे केज तहसिलसमोर आमरण उपोषण सुरु

26

🔹लाडेगांव येथील मागासवर्गीय गायरान धारकांवरील अन्यायाच्या विरोधात सर्वपक्षीय आंबेडकरी कार्यकर्त्यांची वज्रमूठ

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो-8080942185

केज(दि.21सप्टेंबर):-तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान प्रकरणा वरून तालुक्यातील सर्व दलित पक्ष व संघटना आक्रमक झाल्या असून दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येऊन दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी सर्वपक्षीय आमरण उपोषणाला बसले आहेत.

लाडेगाव ता. केज येथील गायरान प्रकरणा वरून सर्व दलित संघटना व पक्ष एकत्र आले आहेत. दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी ११:३० वा. केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

उपोषणार्थींच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. त्या मागण्या अशा आहेत; युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप दहिफळे व बिट जमादार डोईफोडे यांना निलंबित करावे. दलित समाजातील अतिक्रमण धारकांना विरोध करण्यासाठी या गायरान जमिनीवर राबविण्यात येणार असलेले वनीकरण आणि नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा. गायरान जमिनितील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. गायरान जमिनीशी अर्था-अर्थी काही एक संबंध नसणारे सवर्ण समाजातील गावगुंड हे दलित समाजावर अन्याय करीत असताना व त्यांच्या गुन्हे दाखल असतानाही प्रशासन कार्यवाही करीत नसल्याने दलित वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दलित समाज हा गुन्हेगारी प्रवर्गातील नाही तरी आकसापोटी त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित ठेण्याचा प्रयत्न करावा. अशा विविध मागण्या आहेत.