प्रामाणिक पणा दाखविल्याबद्दल एकनिष्ठा तर्फे सत्कार

27

✒️मनोज नगरनाईक(विशेष प्रतिनिधी)

खामगांव(दि.23ऑक्टोबर):-वेदिका कॉस्मेटिक व जनरल स्टो चे संचालक तथा एकनिष्ठा सामाजिक कार्यकर्ते श्री हरिदास बावस्कर यांचा मोबाईल विवो कंपनी 16,000 हजार रुपये किंमतीचा हरवला असता वाडी येथील आदित्य वाघमारे, बाळा हेलोडे यांना सापडताच त्यांनी तो मोबाईल लगेच श्री बावस्कर यांना परत करून प्रामाणिक पणा दाखविल्याबद्दल एकनिष्ठा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गौ सेवक श्री सूरजभैय्या यादव यांनी दोघांचा सत्कार शॉल बुके देऊन केला.

यावेळी विनोद लाहुडकर, रामेश्वर कापडे, मुन्ना पवार, कैलास अंबुसकर, मंगेश कापडे, जितेंद्र मच्छरे, अनिल चव्हाण, दिनेश मुळे, विकास धांदु, सागर धांदु, आदि एकनिष्ठा चे कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती हरिदास बावस्कर यांनी दिली.*