मिशन गरुड झेप अंतर्गत अर्हेर नवरगाव या गावात वाचनालयाची निर्मिती

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.23ऑक्टोबर):-जिल्हा परिषद चंद्रपुर व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपुर यांच्या वतिने मा.डॉ.मित्ताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी ,चंद्रपुर यांच्या प्रेरणेने जिल्हात मिशन गरुड झेप या अंतर्गत गाव तिथे वाचनालय सुरु करुन कुशाग्र बुधिमत्तेच्या विद्यार्थाना स्पर्धा परिक्षेकरिता तयार करण्याकरिता वाचनालयाची निर्मिती करण्याची जबाबदारी SUPER 60 कडे सोपवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने देवानंद तुलकाने सहाय्यक शिक्षक अर्हेर नवरगाव पं.स.ब्रम्हपुरी यांनी या उपक्रमाची सुरुवात आपल्या गावापासुनच केली आहे.

शाळेचे मुख्याध्यापक श्री तातेराव तिमांडे सर यांनी सकारात्मक भुमिका घेवुन गावातील पदाधिकारी यांची भेट घेवुन वाचनालयाकरिता कायम स्वरुपी इमारत मिळावी या करिता प्रयत्न केले.दलित सुधार वस्ती अंतर्गत बांधण्यात आलेली इमारत ही कायमस्वरुपी वाचनालयाकरिता देण्याकरिता विहाराचे अध्यक्ष मा.जितेंद्र लोखंडे व संजय मेश्राम सचिव तसेच सदस्य गण तयार झाले.वरिल इमारतीची शाळेच्या वतिने डागडुगी व रंगरंगोटी शाळेच्या वतिने करण्यात आली.शरद ढोक यांनी दोन सिलिंग पंख्याची व्यवस्था करुन दिली.बाहेरील शाळेतील शिक्षकांनी व गावातील लोकांनी स्पर्धा परिक्षेचे पुस्तके दान स्वरुपात दिले व वाचनालयाची निर्मिती करण्यात आली.

या वाचनालयाचे उद् घाटन सौ.दामिनी चौधरी सरपंच अर्हेर नवरगाव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.क्रिष्णाजी सहारे जि.प.सदस्य चंद्रपुर तथा माजी शिक्षण सभापती यांनी भुषवले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.विलासभाऊ उरकुडे पं.स.सदस्य तथा माजी उपसभापती, मा.डॉ.प्रा.रवि रणदिवे,मा.अनिल चिलमवार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी,मा.जितेन्द्र कऱ्हाडे उपसरपंच,मा.अरविंद साखरकर केन्द्र प्रमुख अर्हेर,मा.रामसागर बेदरे अध्यक्ष शा.व्य.समिती,मा.धनिराम ठेंगरे उपाध्यक्ष,मा.सौ मडावी मँडम ग्रा.पं.सदस्या,मा.गोवर्धनजी बागडे सदस्य ,सौ.करंडे मँडम,सदस्या,सौ.कराणकर मँडम सदस्या,मा.ठेंगरे सर विकास विद्यालय अर्हेर,मा.शरद ढोक,माहीम कऱ्हाडे , ग्रामपंचायत सचिव , पदाधिकारी ,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालक वर्ग उपस्थित होते.त्यावेळी पालकांनी वाचनालयाकरिता पुस्तके दान दिले तर माहिम कऱ्हाडे यांनी वाचनालयाकरिता दैनिक वर्तमान पत्र देत असल्यांचे सांगितले.

लोक सहभागातुन वाचनालयाची निर्मीती करण्यात आली व गावातील लोकांनी वाचनालयाकरिता स्पर्धा पुस्तके दान देण्याचे ठरविले . स्वयंसेवक व शिक्षणप्रेमी यांच्या माध्यमातुन वाचनालय सायंकाळी दोन तास सुरु करण्याचे ठरविले.मा.सौ दामिनी चौधरी सरपंच यांनी वाचनालयाकरिता भौतिक सुविधा व स्पर्धा पुस्तके ग्रामपंचायतीच्या वतिने पुरविण्यात येईल असे सांगितले.

मा.क्रिष्णाजी सहारे जि.प.सदस्य चंद्रपुर यांच्या कडुन शाळेतील 264 मुलांना मास्क चे वितरण या प्रसंगी करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन देवानंद तुलकाने सहाय्यक शिक्षक अर्हेर नवरगाव यांनी केल तर आभार प्रदर्शन मा.चंद्रशेखर जिबकाटे सर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता मा.तातेराव तिमांडे मुख्याध्यापक अर्हेर तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.