रामेश्वर तिरमुखे लिखित ‘संतवाट संस्कारविधी’ पुस्तक जीवन समृद्धपणे जगण्याचा एक पर्याय होय.– पदमश्री डॉ रवींद्र कोल्हे

25

✒️अंबड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अंबड(दि.16नोव्हेंबर):-सत्यशोधक वारकरी महासंघाचे राज्यप्रभारी तथा व्याख्याते रामेश्वर तिरमुखे यांच्या ‘संतवाट संस्कारविधी’ पुस्तकाचे प्रकाशन  पदमश्री डॉ रवींद्र कोल्हे  यांच्याहस्ते तर पदमश्री डॉ स्मिताताई कोल्हे,प्राचार्य भागवत कटारे ,प्राचार्य चंद्रकांत बुरटे, प्राचार्य विश्वास कदम,कृ.उ.बाजार समितीचे सभापती सतिष होंडे,डॉ बा आं.म.विद्यापीठाचे सिनेट सदस्य ऍड संजय काळबंडे, लेखक रामेश्वर तिरमुखे त्यांच्या आई कस्तुराबाई तसेच पत्नी छायाताई यांच्या उपस्थित संपन्न झाले. 

 पुस्तकाचे प्रकाशन करतांना डॉ रवींद्र कोल्हे यांनी आधुनिक काळात जीवन जगत असतांना हजारो वर्षांपासून असणाऱ्या अप्रासंगिक रूढी,प्रथा,परंपरा यांचा त्याग करून काळानुसार बदल सुचविलेल्या विधीसंस्कार यासाठी हे पुस्तक अतिशय गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धनासाठी दिलेली पध्दती ही विज्ञानवादी संस्कार करणारी आहेत.”संतवाट संस्कारविधी” या पुस्तकाची आजच्या समाजाला खूप गरज आहे. या पुस्तकात गर्भसंस्कार,बारसे, नामकरणविधी,लग्नविधी,

गृहप्रवेश,अंत्यसंस्कार दहावे-तेरावे,भूमीपूजन, जलपूजन,विठ्ठल रुख्मिनी पूजा, वर्षश्राद्ध /स्मृतिदिन  या विधिबाबत पद्धतशीर चिकित्सक मार्गदर्शन केले आहे. या सर्व विधीसाठी संत नामदेव, संत तुकाराम,संत कबीर, संत तुकडोजी महाराज,महात्मा जोतीराव फुले,संत गाडगेबाबा यांच्या प्रासंगिक अभंगरचना व त्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.पुस्तकावर भाष्य करतांना डॉ विनोद वाघाळकर यांनी 21 व्या शतकात मानवी जीवनातील समृद्धता ठेवण्यासाठी सदरील पुस्तक प्रत्येक कुटुंबातील सदस्य यांच्या वाचनात येणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन केले.पर्यावरण संवर्धनासाठी, कुटुंबातील सदस्यांना संस्कारित करण्यासाठी हे पुस्तक गरजेचे आहे. पदमश्री डॉ स्मिताताई कोल्हे यांनी पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले. या पुस्तकातील दहावे तेरावे या प्रकरणात असणाऱ्या संत कबीर यांचा दोहा.. माटी का एक नाग बनाके पूजे लोग लुगाया…यावर प्रकाश टाकून जिवंत असतानाच आई वडिलांना भात भरवा.त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा भात फेकण्याची गरज नाही!

डॉ स्मिताताई यांनी या पुस्तकातून दिलेल्या काही बाबीचा निश्चितच आम्ही विचार करून स्वतः व आपणही अंगीकार करावा याबाबत आग्रह केला.कार्यक्रमाला उपस्थितीत प्राध्यापक,डॉक्टर, शिक्षक, साहित्यिक,विद्यार्थी युवा, प्रतिष्ठित नागरिक ,पुरुष महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ प्रा व्ही टी काळे ,सूत्रसंचालन अशोक लोंढे ,आभार परमेश्वर काळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संयोजनात विवेकानंद महाविद्यालयाचे ग्रंथपाल गोवर्धन औटी, यशवंत प्रतिष्ठान व माजी विद्यार्थी मत्स्योदरी महाविद्यालयाचे संजय खोरे, डॉ मुरलीधर जाधव,प्रा विशाल खरात,उद्धव बाजड,डॉ गोपाल अडाणी,अल्ताफ शेख,सरपंच श्रीहरी तिकांडे यांनी मेहनत घेतली.