भालचंद्र माध्यमिक विद्यालयाच्या आंदोलनाला यश, रास्ता रोको आंदोलनापुर्वीच गतिरोधक बसविण्यात आले – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

27

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.28नोव्हेंबर):-महिनाभरापुर्वी दि.२८ ऑक्टोबर गुरूवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली मौजे लिंबागणेश ता.जि.बीड येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयासमोर मांजरसुंभा- पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांची संख्या पाहता गतिरोधक बसविण्यात यावेत यासाठी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहुन गांधीगिरी पद्धतीने निवेदन देण्यात आले होते याच वेळी मागणी मान्य न झाल्यास दि.२९ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा दिलेला होता.

रास्ता रोको आंदोलनापुर्वीच गतिरोधक बसविण्यात आले:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_____
दि.२८ ऑक्टोबर रोजी गांधिगिरी पद्धतीने केलेल्या आंदोलनात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता याचवेळी महिनाभरात गतिरोधक न बसवल्यास दि.२९ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता परंतु त्यापुर्वीच गतिरोधक बसविण्यात आले, आंदोलनाला आलेल्या यशाबद्दल भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी-पालक यांनी समाधान व्यक्त केले.