अंबाडा येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन !

51

🔹जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचा अभिनव उपक्रम !

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

मोर्शी(दि.28नोव्हेंबर):-शासनाच्या विविध योजना असतात. मात्र प्रत्यक्षात लोकांना त्या योजनांचा लाभ घेता येत नाही. त्याचप्रमाणे, गावक-यांपूढे समस्यांचा मोठा डोंगर उभा असतो. त्या सोडवण्यासाठी अनेकदा त्यांना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी वणवण करावी लागते. आता मात्र, थेट आमदार देवेंद्र भुयार गावक-यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना घेऊन येणार आहेत.आमदार आपल्या दारी हा उपक्रम आमदार देवेंद्र भुयार अंबाडा पंचायत समिती सर्कलमधील गावात २९ आक्टोबर रोजी अंबाडा येथे राबवत आहेत. हा उपक्रम अंबाडा पंचायत समिती सर्कलमधील अंबाडा, आष्टगाव, सायवाडा, गणेशपूर, पिंपरी, अर्धमानी, दहसुर या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविन्यासाठी घेण्यात येत असून थेट आमदार देवेंद्र भुयार लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात, घरापर्यंत पोहोचणार आहे.

आमदार देवेंद्र भुयार हे आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून दिला तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून परिचीत आहेत. आमदार आपल्या दारी उपक्रमामध्ये शिधापत्रिका काढणे, वीज जोडणी अर्ज, जमिनीचा फेरफार, वृध्दांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, जातीचे दाखले तयार करणे, अतिक्रमण नियमानुकूल करुन जमिनीचे पट्टे वाटप करणे, अपंगांना प्रमाणपत्राचे वितरण, वैद्यकीय मदतीचे अर्ज भरणे, आरोग्य व महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठीचे अर्ज भरुन घेणे आदी लोकहिताची कामे केली जाणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी गावपातळीवर आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने घेऊन प्रकरण निकाली काढण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मोर्शी वरुड तालुक्यात हा पहिला उपक्रम आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नातून राबविण्यात येत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न सुरू आहे, अधिक माहितीकरिता कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचे आवाहन आमदार देवेंद्रभाऊ भुयार यांनी केले आहे .