भीम आर्मी संविधान सन्मान यात्रेचे पुसद मध्ये जंगी स्वागत.!

    45

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.28नोव्हेंबर):-भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेकडून संपुर्ण महाराष्ट्रराज्यभर संविधान सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.!

    संविधानरक्षक मा.ऍड.भाई चंद्रशेखर आजाद भीम आर्मी संस्थापक यांच्या आदेशाने व मा.सितारामजी गंगावणे महाराष्ट्र अध्यक्ष,मा.अशोकजी कांबळे राष्ट्रीय का.सदस्य,मा.सुनीलजी गायकवाड प्रदेश कार्याध्यक्ष,मा.दीपक भालेराव प्रदेश मुख्य संघटक यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रभर संविधान जनजागृती सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

    आज दि.२७ ला संविधान सन्मान यात्रा ही पुसद मध्ये दाखल झाली या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.!छत्रपती शिवाज महाराज चौक मधील तीन पुतळा समिती येथे महामानवाना अभिवादन करण्यात आले.!

    त्यानंतर संबोधी बुद्ध विहार येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले.!सर्वप्रथम विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध व विश्वभुषण बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून माल्यार्पन करण्यात आले व पुज्य भन्ते धम्मदीप यांना वंदन करण्यात आले.!संविधान सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुनीलजी गायकवाड कार्याध्यक्ष भीम आर्मी महाराष्ट्र राज्य हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून संबोधी बुद्ध विहार चे पुज्यनिय भिक्खु वंदनीय धम्मदीप जी हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन नारायण मेश्राम हे होते.! उत्तम साळवे सोशल मीडिया प्रमुख भीम आर्मी महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती होती.!प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

    त्यानंतर संबोधी बुद्ध विहार श्रावस्तीनगर येथील पुज्यनिय भन्ते धम्मदीप जी यांचा समस्त भीम आर्मी टीम कडून पुष्पगुच्छ व भारतीय संविधान देऊन त्रिवार वंदन करण्यात आले.व राज्य कमिटीतील प्रमुख पदाधिकाऱ्याचा सुद्धा पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली माणुसकीची भिंत या सेवाभावी संस्थेच्या प्रमुख पदाधिकार्याचां पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.सोबतच सामाजिक कार्यकर्ते मा.शरद ठेंबरे सदस्य ग्रामपंचायत बोरगडी यांचा सुद्धा पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

    व संबोधी बुद्ध विहार सुशोभिकरण व नुतन बांधकाम करण्यासाठी कार्य हाती घेतले असे स.शिक्षक मा.नरेंद्र पाटील सर यांचा सुद्धा पुष्पगुच्छ व भारतीय संविधान देऊन सन्मान करण्यात आला.तसेच भीम आर्मी च्या संविधान सन्मान यात्रेला संपुर्ण महाराष्ट्रभर संरक्षण पुरवणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आभार म्हणुन कार्यक्रमाला सुरक्षा पुरवणारे शहर पोलीस स्टेशन चे मा.बेंद्रे साहेब,मा.भालेराव साहेब व त्यांच्या टीम चा सुद्धा पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.!व प्रमुख पाहुण्यांची संविधानावर भाषणे झाली.पाहुण्यांना पुढचा दौरा असल्याकारणाने व जमावबंदी असल्याने कार्यक्रमाची सांगता ही भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून करण्यात आला.!या या कार्यक्रमाचे आयोजन अशोकभाऊ भालेराव जिल्हाध्यक्ष भीम आर्मी यवतमाळ जिल्हा यांनी केले होते.!

    संविधान सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने अशोकभाऊ भालेराव जिल्हाध्यक्ष भीम आर्मी,धनराज कांबळे जिल्हा महासचिव,श्यामभाऊ देवकुळे जिल्हा उपाध्यक्ष,सूरज पाईकराव पुसद तालुका उपाध्यक्ष,स.शिक्षक मनोज नाईक सर,प्रा.परमेश्वर खंदारे सर,राजु भाऊ भालेराव,माणुसकीची भिंत चे गजानन गांवडे,जगन रावल,ससाणे सर,पांडे सर,रंगराव बनसोड,अशोक बलखंडे, संजय मनवर,नितीन खाडे,नागेश वाढवे,गजानन जाधव,बबन शेळके,विशाल भगत इत्यादी कार्येकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.!

    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स.शिक्षक नरेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन भीम आर्मी उपाध्यक्ष श्याम देवकुळे यांनी केले.!