म.फुले यांनी स्वतःच निर्मिती करून खऱ्या अर्थाने प्रचार-प्रसार केला

34

✒️सातारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सातारा(दि.28नोव्हेंबर):-आधी केले मग सांगितले…याप्रमाणे म.ज्योतिबा फुले यांनी करून दाखवलेल्या अनेक गोष्टी आहेत. कात्रजचा बोगदा,येरवडा ब्रिज, खडकवासल्याची कालवे, पुण्यात पाण्याचे नळ, रस्ते,स्वता:च शाळा काढून पत्नीस शिकवून शिक्षिका केली.शिवाय,समकालीन लोकांचे लेखन,स्वतःचे विचार – जागर व प्रचार-प्रसाराचे महनीय कार्य पुस्तकाचे दुकानही स्वतःच काढले होते. असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष विलासराव कांबळे यांनी केले.

म.ज्योतिबा फुले यांच्या १३१ व्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कांबळे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ट मार्गदर्शक शामराव बनसोडे होते.कांबळे म्हणाले,म.फुले कमिशनर असताना पुना कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अनेक बांधकाम पूर्ण केलेली आहेत. त्यांच्या विचारसरणीचे कन्स्ट्रक्शन व इंजिनिअरिंग निर्माण केले होते. मुंबई महानगरपालिका व गिरण्याही निर्माण केल्या होत्या. कोल्हापूरमध्येही लक्ष्मी मिलची निर्मिती त्यांनीच केली होती.कोरोनाची जशी महामारीमध्ये रुग्णांना मिळणारी जी वागणूक मिळाली.तसाच प्रकार त्याकाळी पटकीच्या रोगाने थैमान घातले होते.तेव्हा म.फुले यांचा मुलगा डॉ.यशवंत यांनी स्वतः पाठीवर घेऊन रुग्णास सेवा दिली होती.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ,धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष बी.एल.माने व लेखक-विचारवंत सुदर्शन इंगळे यांनीही अभ्यासपूर्ण माहिती कथन केली. भन्ते दिंपकरजी यांच्या अधिपत्याखाली विधी पार पाडला. प्रारंभी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख निमंत्रक तथा वंचितचे महाराष्ट्र पश्चिम उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व संघटक सतीश कांबळे यांनी अर्पण केले.

म.ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार भिमाई स्मारकचे इंजि. रमेश इंजे व वंचितचे जिल्हा सचिव दादासाहेब केंगार यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले.”फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे.अशी वर्षोनुवर्षे मागणी करणारे अनिल वीर यांनी प्रास्ताविकेत पुनरुच्चार केला. ते पुढे म्हणाले, “छ. शिवरायांच्या स्मारकाचा शोध म. फुले यांनी घेतला होता. शिवाय, शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली होती. त्यामुळे त्यांच्या खऱ्या-खुऱ्या इतिहासास सलाम. त्यांच्या कार्यास कोण्हीही विसरणार नाही. डॉ.आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या गावी केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे शिल्पसृष्टीचे काम पूर्ण करावे.तसेच जिल्ह्यातील कटगुण या गावी म.फुले व नायगाव या गावीही राज्य सरकारने शिल्पसृष्टीचे काम हाती घ्यावे.”

राष्ट्रेत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब ननावरे,गौतम भोसले,वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा महासचिव गणेश भिसे, तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, अंनिसचे भगवान रणदिवे,पी.डी. साबळे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार काळे, शाहीर माधव भोसले,अंकुश (भाऊ) धाइंजे,मुरलीधर खरात, रमेश गायकवाड,महादेव मोरे,जे. डी. कांबळे,अशोक भोसले, विकास तोडकर, सावंत,कांबळे, लाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर- कार्यकर्ते उपस्थित होते.