तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका ओळखून उपाययोजना करा – आ.लक्ष्मण पवार

40

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.28नोव्हेंबर):-येथील उपजिल्हा रुग्णालयातून रेफर चे प्रमाण वाढत चालले आहे. सगळ्या सुविधा असताना पेशंट रेफर का करता , एखादे ऑपरेशन केल्याचे उदाहरण देऊन, न ना चा पाडा सुरू ठेवणे योग्य नाही, अशा कडक शब्दात बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी डॉक्टरांना सक्त आदेश दिले.

तर तिसरी लाट येण्याची शक्यता सर्वत्र वर्तवली जात असताना हा धोका ओळखून उपाययोजना करा आशा सूचना आ.पवार यांनी दिल्या. रविवार दि.२८ रोजी सकाळी दहा वाजता गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आमदार लक्ष्मण पवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला आ.लक्ष्मण पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक एम.एच. चिंचोळे, भुलतज्ञ डॉ.राजेश शिंदे, डॉ.रौफ, डॉ.काकडे, डॉ.राजेंद्र आंधळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

दरम्यान, यावेळी पुढे बोलताना आमदार लक्ष्मण पवार यांनीही मागील महिनाभरातील रुग्णालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत समन्वय ठेवा, काही अडचणी असतील तर थेट मला सांगा.