दोंडाईचा येथे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

65

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.29नोव्हेंबर):- रावल नगर संतोषी माता दोंडाईचा येथे महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सत्यशोधक समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून पूजन करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना मनोज महाजन सर यांनी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा पुणे भिडे वाडा येथे मुलींसाठी सुरू केली व तेव्हापासून महिलांना खरा हक्क मिळाला आज महिलाराष्ट्रपती, पंतप्रधान डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पोलीस सेवा देत आहे ते म्हणजे महात्मा फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचा न्याय हक्क मिळाला. महिला शिक्षणाची चळवळ होळी करून, संघर्ष करून न्याय देण्यात आला.

दोंडाईचा शहरात एखादी जागा नियोजित करून महात्मा फुले या थोर महापुरुषांचे नाव देण्यात यावे व पुतळा उभारण्यात यावे अशी संकल्पना मांडली यावेळी माझी बांधकाम सभापती जितेंद्र गिरासे, प्रदेश उपाध्यक्ष मानवाधिकार केंद्रीय नई दिल्ली प्रदेश उपाध्यक्ष पिंटू महाजन, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे ईश्वर माळी, प्रहार तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया, कयूम पठाण, बिलाल बागवान, सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज महाजन, रवींद्र माळी, मयूर महाजन, अनिल महाजन ,अनिल जाधव, पत्रकार जीवन रामोळे, माजी सैनिक वाडीले साहेब, राहुल माळी ,आप्पाजी निर्मल माळी, मनोज माळी, सागर महाजन भारत जाधव बापूजी मिस्‍तरी निलेश ठाकूर इत्यादी उपस्थित होते