संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट

  43

  ?वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम

  ✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

  उमरखेड(दि.28नोव्हेंबर):-ढाणकी येथे 26 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे पोलीस चौकी, व प्राथमिक आरोग्य केंद्रात महामानव भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन संविधान दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती मुनेश्वर, बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कपिल म्हस्के यांना प्रतिमा भेट देण्यात आली.

  या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे, नगरसेवक संबोधी गायकवाड, तालुकाप्रमुख संतोष जोगदंडे, भारत कांबळे, रामा गायकवाड, नागेश पाटील, विष्णू वाडेकर, हिरामण कांबळे, बशीर भाई इत्यादी वंचित बहुजन आघडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.