पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन करणे आवश्यक- योगिता शेळके

45

✒️प्रतिनिधी आष्टी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.29नोव्हेंबर):-पदवीधर अंशकालीन चा प्रश्न गेल्या २० वर्षापासून प्रलंबित असून २००४ पासून आज पर्यंत अनेक जीआर काढले मात्र अद्याप पर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नसून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी तालुका, जिल्हा स्तरावर अनेक आंदोलने करून निवेदने दिले, एवढेच नाही तर प्रत्येक जिल्हास्तरावरती जिल्हाधिकाऱ्याला सोबत अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात चर्चा झाल्या, एवढेच नाही तर औरंगाबाद येथील आयुक्तालयात पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात निवेदनही दिले, मात्र अद्याप अंशकालीन च्या कामासंदर्भात संबंधित प्रशासनाने अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय न दिल्याने अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

काहींनी आत्महत्या केल्या तर, अनेक अंशकालीन कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपली असून उर्वरित पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना हक्काची नोकरी मिळावी, पगार नियमाप्रमाणे देऊन, ११ महिन्यानंतर कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येऊन, ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, नसता त्यांच्या कुटुंबातील वारसांना नोकरीत सामावून घेऊन, ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबातील वारसांना शासनाने मदत द्यावी, आंदोलनस्थळी मागण्या केल्या जाणार असून महामोर्चा व बेमुदत धरणे आंदोलनाची रूपरेषा व तारीख लवकरच निश्चित करून आयुक्त कार्यालयास निवेदन देऊन महामोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार असून जोपर्यंत आयुक्त कार्यालय ठोस निर्णय देणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालू ठेवले जाणार असून अंमलबजावणी तात्काळ न केल्यास जिल्हा अधिकारी, स्वयंरोजगार अधिकारी व आयुक्त यांना जिम्मेदार करण्यात येईल, सोबत वैशाली राणे मुंबई जिल्हाध्यक्ष, उत्तम शिंदे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष, भैरू खांडेकर उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष, दत्ता वायाळ, सुमन शिंदे, निर्मला माटे गेवराई, सुधीर कुलकर्णी, बाबासाहेब भोसले, शेख निसार, भागवत गाडेकर, गणेश भोसले, धनंजय कुलकर्णी, नितीन गाढवे सुहास पाटील, दयानंद कुलकर्णी, जगताप, बाळासाहेब जाधव कडा, शांतीलाल काळपुंड, गोरख मोरे आदीजन समर्थन करणार असून सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद आयुक्त कार्यालयासमोरील महामोर्चा व बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान पदवीधर अंशकालीन बीड जिल्हा महिला अध्यक्षा योगिता शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे .