राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले जिल्हास्तरीय ‘गुणवंत शिक्षक पुरस्काराने’ संजय गायकवाड सन्मानित

  42

  ?तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मला सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळणे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे – संजय गायकवाड

  ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

  धरणगांव(दि.29नोव्हेंबर):- धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळी खुर्द येथील संजय पोपट गायकवाड यांना महात्मा ज्योतीराव फुले स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ( आर.एम.बी.के.एस ) अंतर्गत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रथम अधिवेशन जळगाव येथे हातनूर सांस्कृतिक हॉल येथे संपन्न झाले . यामध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३७ शिक्षक बंधु – भगिनींचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. यात जि.प.प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथील संजय पोपट गायकवाड यांची सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानरचनावादी अध्यापन, ज्ञानकुंभ, प्रश्नमंजुषा, क्रीडास्पर्धा असे विविध उपक्रमांचे आयोजन, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाबरोबरच ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत “शिक्षक आपल्या दारी” उपक्रम राबविला. तसेच याच काळात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण, कोरोना रुग्ण शोध मोहीम, रेशनिंग दुकानावर कर्तव्य,जनजागृती आणि रक्तदान यासारखे विद्यार्थी व समाज हिताचे उपक्रम राबविले.

  पुरस्कार वितरण प्रसंगी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण मॅम, प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील, प्रा. गणपतराव धुमाळे एस.एस. मणियार लॉ कॉलेज जळगाव, विनिता सोनवणे मॅम आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल, राजेंद्र सपकाळे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जळगाव, बामसेफ चे राज्यसदस्य सुमित्र अहिरे, प्रोटान चे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, मिलिंद भालेराव, मिलिंद निकम, सुनिल देशमुख, पी.डी.पाटील सर, हेमंत माळी सर, लक्ष्मण पाटील सर तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

  पुरस्कार प्राप्तीनंतर धरणगाव तालुका गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे तसेच धरणगाव तालुक्यातील विविध शिक्षक , सामाजिक संघटना यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महात्मा ज्योतीराव फुले स्मृती दिनाच्या निमित्ताने मिळालेला सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ हा प्रेरणादायी आहे. येत्या काळात नक्कीच अपेक्षित कार्य करण्यासाठी व समाजाची नाळ जोडून चांगले कार्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवेल. असे प्रतिपादन पुरस्कारार्थी संजय गायकवाड यांनी केले.