क्रांतीसुर्य म.फुले यांनी शिक्षणातून परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवली

31

🔹आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,अजयदादा धोंडे यांची उपस्थिती

🔸समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.29नोव्हेंबर):-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या जीवन भरातील कार्यातून सर्वसामान्य दीनदलित दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी,शेतमजूर,वंचित घटकांना शिक्षणातून नवा तेजस्वी आयाम निर्माण करून दिला असे सांगून संस्कारक्षम ज्ञानातून समता आणि परिवर्तनाची अखंड ज्योत तेवत ठेवली असे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.दरम्यान आ.सुरेश धस,युवानेते अजयदादा धोंडे यांनी चौकात येऊन अभिवादन केले.माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,माजी उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर,हौसराव आजबे महाराज,शिवाजी बिडवे महाराज आदीसह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्तम नियोजनाने म.फुले पुण्यतिथी सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजित केल्याने दत्ताभाऊ बोडखे यांचे जाहीर कौतुक करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या कित्येक वर्ष आधीपासून अंधश्रद्धा रूढी परंपरा आणि अज्ञानाच्या खाईत सापडलेल्या मानवी समाजव्यवस्थेची अत्यंत दुर्दैवी अवस्था पाहून म.फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणातून क्रांती घडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला अशा क्रांतिकारकांना विनम्र वंदन करत आ.सुरेश धस आणि भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस युवानेते अजयदादा धोंडे यांनी विनम्र अभिवादन केले.

म.फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मानवी समाजव्यवस्थेला अंधश्रद्धा रुढी-परंपरा तून मुक्त करून शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री शिक्षण,समता शांतता आदी मूल्यांचा पायंडा निर्माण केला असे सांगत म.फुले आधुनिक समाजरचनेचे आधुनिक शिल्पकार असल्याचा गौरव अखिल भारतीय समता परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा पुण्यतिथी उत्सवाचे नियोजनकर्ते दत्ताभाऊ बोडखे यांनी केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध जाती,धर्म,पंथ व विविध कार्यकर्ते व समाज धुरिनांनी परिश्रम घेतले.
———————————————-
म.फुले पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम,स्पर्धा
राज्यासह जिल्हाभर यामध्ये मोठ्या प्रमाणावर म.फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.आष्टी येथे विविध निबंध स्पर्धा चित्रकला,भाषण स्पर्धा आदीसह विविध उपक्रम राबविण्यात आले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची महती सांगण्यात आली.
———————————————-
दत्ताभाऊंचे मान्यवरांकडून कौतुक
आष्टी तालुक्याच्या सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने आघाडीवर राहून सामाजिक बांधिलकी जपणार्‍या अखिल भारतीय समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी म.फुले यांच्या पुण्यतिथीचे चांगले नियोजन केल्याने याची दखल घेत आ.आजबे,आ.धस,अजयदादा धोंडे,रेडेकर आदीसह मान्यवरांनी कौतुक केले.