विश्वदीप महाबोधी बुद्ध विहारात संविधान दिन संपन्न

  47

  ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

  पुसद(दि.29नोव्हेंबर):- तालुक्यातील श्रीरामपुर येथील विश्वदीप महाबोधी बुध्दविहारात ७२वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी से.नि.शिक्षणविस्तार अधिकारी आयु.पी.डी.खंदारे साहेब,प्रमुख अतिथी म्हणून से.नि. प्राचार्य सुधाकर बनसोड, सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी भिमराव खोडके, सोपानराव वैराळे उपस्थित होते.

  या प्रमुख अतिथींच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

  सुजाता महिला मंडळानी बुद्धवंदना घेतली.
  शालीनीताई आळणे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून शपथ दिली.आयु.पी.डी.खंदारे साहेब यांनी बुद्ध विहाराला ५० हजार रुपये धम्मदान दिल्याबद्दल विश्वदिप महाबोधी बुद्ध विहाराचेअध्यक्ष साहेबराव गुजर यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

  या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भिमराव खोडके,पी.बी.भगत, सुधाकर बनसोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.डी.खंदारे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील कलमांची सखोल माहिती दिली.

  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शालीनीताई आळणे यांनी केले तर प्रास्ताविक तुकाराम चौरे व आभारप्रदर्शन प्रल्हाद खडसे यांनी केले.

  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुद्धविहार समितीचे प्रकाश आळणे, नागोराव कांबळे, पुंडलिक कांबळे,दगडू कांबळे,के.के.दिघाडे,शामराव वाकोडे,सुजाता महिला मंडळाच्या जया काळे,रंजना आडोळे,सविता काजळे,प्रमिला खंदारे, रत्नमाला शेंडे एकता खोडके,अनिता इंगोले,प्रिया डहाणे,रंजना आळणे, संजीवनी वैराळे,शिलादेवी मुनेश्वर, सुधमां कांबळे आदिंनी सहकार्य केले.