आंदोलन सुरूच,महामंडळाची कारवाई,कर्मचारी मागणीवर ठाम.205 कर्मचाऱ्यांचे निलंबन

    38

    ✒️आनंद टेकुळे(प्रतिनिधी परभणी)मो:-8830970125

    परभणी(दि.30नोव्हेंबर):-शासकीय सेवेत समाविष्ट करावे .या मागणीसाठी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी राज्याव्यापी संप सुरु केला असून,शनिवारी प्रशासनाने 205 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.मात्र या कारवाईनंतर कर्मचारी मागणीवर ठाम असून ,आंदोलन सुरूच ठेवले आहे.एसटी महामंडळाचे शासन सेवेत विलीनीकरण करावे, यासाठी मागील 24 दिवसापासून बेमुदत संप पुकारका आहे.जिहल्यातील चारही आगारांमधील 100 टक्के कामचारी या संपत सहभागी झाले असून,एसटी सेवा टप्प आहे.मध्यंतरी परिवहन मंत्र्यांनी पगारवढीचे आशवासन देऊन आंदोलन मागे घेण्याचे आहावन केले होते.

    त्यानंतरही कर्मचारी शासन सेवेत विलीनिकारणाच्या मागणीवर ठाम असून,आंदोलन सुरूच आहे.दरम्यान संपात सहभागी झलेल्या 205 कर्मचाऱ्यांवर शनिवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.त्यामध्ये विभागीया कार्यालयातील लीपिक व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.प्रत्येक आगरामध्ये सरासरी 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.दरम्यान,निलंबाच्या कारवाहीनंतरही कर्मचारी मागणीवर ठाम असून,सोमवारी 100 टक्के कर्मचारी संपत सहभागी असल्याने जिल्हातून एकही बस धावली नाही.