निराधारांचे रखडलेले अनुदान तात्काळ वाटप करा

33

🔺माजलगावमध्ये रस्ता रोको

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

माजलगाव(दि.30नोव्हेंबर):-शहरासह ग्रामीण भागातील शेकडो निराधारांचे मिळणारे अनुदान येथील पोस्ट ऑफिसच्या हलगर्जीपणामुळे अजून प्रयन्त मिळाले नसल्याने या वृद्ध व निराधार लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांच्या हक्काचे मानधन तात्काळ वाटप करावे, या मागणीसाठी काल भारतीय जनहित काँग्रेस पार्टी व भीम सेना भीम आर्मी चे महाराष्ट्र राज्याचे नेते सलीम बापू यांनी भव्य रस्ता रोको आंदोलन केले.

गोरगरीब वृद्ध निराधारना वेठीस धरणार्‍या माजलगाव पोस्ट ऑफीसच्या निषेधार्थ काल दि.30 रोजी पोस्ट ऑफीस समोर मा.आर. आर. पांडीयन यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन व भव्य निदर्शने करण्यात आले.येथील तहसील प्रशासनाने निराधारांचे अनुदान पाठविलेले असतांना पोस्ट ऑफीसच्या हिटलरशाही धोरणामुळे तब्बल आठ महिन्यापासून निराधारांचे अनुदान वाटप करण्यात येत नाहीत. त्यामुळे शेकडो निराधांरावर उपासमारीची व हालाकीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.