एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून सरकारने त्वरित मागण्या मान्य करावे-सुदामभाऊ राठोड

44

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1 डिसेंबर):- बस कर्मचारी यांचा विलीनीकरणाचा लढा सुरूच आहे.तरी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या, अशी भूमिका घेत जय विदर्भ पार्टीनेही आंदोलनाला समर्थन दिले. ब्रम्हपुरी बस स्थानकासमोरील आंदोलनात पक्षाचे कोअर कमिटी सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदामभाऊ राठोड यांनी समर्थन पत्र दिले.

यावेळी उपस्थित अमर गाडगे, सौरभ सूर्यवंशी, निखिल डांगे, सचिन मेश्राम, राहुल पत्रे व जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरक्षित प्रवास शक्य ते फक्त लालपरिनेच व्हायची. शासनाने मागण्यांची दखल घेऊन तात्काळ मान्य करावी असी मागणी सुदामभाऊ राठोड यांनी केली आहे.