कोळीवाडा गावठाणात “वैदिक हिंदुत्ववादी राष्ट्रीयत्वाचा” पराभव करणारे जमीन हक्कांचे संविधानिक राष्ट्रीयत्व म्हणजेच लोकनेते दि ब पाटील

27

ब्राह्मणी वैदिक हिंदुत्वाने 85 टक्के मागास भारतीयांना जमीन मालकी नाकारली होती.प्रत्यक्ष नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याला जमीन हक्क म्हणजेच या देशाची मालकी नाकारणाऱ्या या जुलमी विचारांचा वेध घेणारे महात्मा जोतिबा फुले याना, लढवय्ये ओबीसी, लोकनेते दि बा पाटील साहेबांनी गुरुस्थानी होते.आज दि बांच्या जासई गावात महात्मा जोतिबा फुले यांचा भव्य पुतळा दि बांच्या वैचारिक आदर्शांची साक्ष देत आहे.आगरी कोळी कराडी भंडारी बारा बलुतेदार समाजाला गुलाम करण्यासाठी उच्चजातीय ब्राह्मणी गुरू दादा नाना यांनी रायगडात वैदिक हिंदुत्वाचा गुलाल उधळला त्यातूनच शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दि बांच्या विरोधात पुढे आले.शिवसेनेच्या भाजपच्या “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” या फसव्या घोषणेस फाडून टाकण्याची हिम्मत मृत्यूनंतरही दि बा च्या नावात आहे.लोकनेते दि बा पाटील साहेबांनी स्वर्ग नाकारला होता.अर्थात स्वर्गात गेलेल्या पितरांच्या नावावर पिंड दानाचा विधी ते देव धर्म यांच्या नावे धार्मिक दानाचे व्यवसाय उभे करणाऱ्या, पुरोहित शाहिस नाकारणारे दि बा पाटील हे कृतिशील विचारवन्त होते.

मानवी कर्तृत्वाला एकच जन्म पुरेसा आहे.याच जन्मात जन्मदाते आई वडील,नातेवाईक,गावकरी,राज्य आणि देशबांधव यांना येणाऱ्या कित्येक पिढ्या दुवा देतील एवढे सारे देता येते हे दाखवून देणारे दि बा पाटील साहेब होते.ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया याना जमीन पाणी जगलं शिक्षण आरक्षण यातील कोणतेच मानवी अधिकार द्यायचेच नाहीत ही वैदिक मनुवादी विचारसरणी आहे.तीच शिवसेना भाजपा चे तथाकथित हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वही आहे.याविरोधात आम्हाला अर्थात समस्त मागास वर्गीय भारताला अधिकार देणारी विचारधारा देशात बुद्ध, सम्राट अशोक, शिवराय, महात्मा फुले, सावित्री माई फुले, राजर्षी शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर ते दि बा पाटील साहेब अशी थेट आपल्यापर्यंत येऊन पोहचते.भारतीय संविधानात लिखित स्वरूपात आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ती सगुण साकार स्वरूपात या देशातल्या सर्वसामान्य कष्टकरी माणसाला अर्पण केली आहे.

भारतीयांच्या राष्ट्रीयत्वास कायदेशीर आणि स्पष्ठ भाषेत शब्दबद्ध करण्याचे महाकठीण काम संविधान सभेत दिग्विजयी भाषणे करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.दि बांच्या नावासाठी पेटलेल्या सागरपुत्र तरुणांनी वैदिक हिंदुत्वाच्या विरोधी परंतु अधिक योग्य आणि समर्पक असलेल्या संविधानिक लढ्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी येत्या सहा डिसेंबरला चैत्यभूमी दादर येथे जाऊन भारतीय संविधाना सहित किमान पाच हजार रुपयांची पुस्तके घरी आणायला हवीत.प्रचंड साहित्य आणि विचार असताना त्यांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे लोकनेते दि बा पाटील यांच्यासारखे विचारवन्त नेते नसतील तर पुन्हा पुन्हा गुलामी येऊ शकते.अर्थात शेतकरी विरोधी सावकारी मंदिर धर्माच्या दानातून पोसली जाते.या धार्मिक पुरोहित शाहिस वैदिक हिंदुत्वाचे बंधन नाही.मुस्लिम नियाज खाते हे आजही दत्तू भिवा ठाकू वय नाबाद 78 वर्षे.या धुतुम उरणच्या शेतकऱ्यांचा जीव सिडको च्या माध्यमातून घेऊ शकते.सर्वच देव स्वर्ग चमत्कार आत्मा मानणाऱ्या पुरोहित भटजींना आयते खायचे असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्याला जमीन मालकी नाकारली.शेतात कष्ट करण्याची अखंड गुलामी त्याची बायको मुले आणि नातवंड याच्यावर लादली.

मागच्या सत्तर वर्षात त्यांचेच म्हणजे मनु समर्थक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सत्ताधारी जातींचे सरकार असल्यामुळे सिडकोच्या अत्याचारात दि बांचे पाच हुतात्मे झाले.अलीकडे सिडकोच्या आवारात तीन पिढ्या पुनर्वसन नाकारले म्हणून दत्तू भिवा ठाकूर याच्यावर आत्महत्या करायची वेळ आलीय.आज दि बांच्या आंदोलनातून समृद्ध झालेले काही प्रकल्पग्रस्त जगातील सर्वात महागड्या ब्रॅण्डेड गाड्या हेलिकॉप्टर आणि काही तर नियमित विमान प्रवास करीत असले,तरी लोकनेते दि बा पाटील हे महाराष्ट्राच्या लाल परीने म्हणजेच एसटीने प्रवास करीत.मुबई परिसरातील एसटीने प्रवास करीत असलेले चार वेळा आमदार, दोन वेळा खासदार आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते असलेले दि बा हे पहिले अन शेवटचे प्रामाणिक नेते ठरू नयेत?यासाठी दिबांची आणि आम्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांची एसटी वाचली पाहिजे.एसटी विकून त्यांचे 250 एसटी डेपोच्या अब्जावधी रुपयांच्या महागड्या जागा विकण्याचा सरकारचा डाव आहे.मातृसत्ताक महिला मासळी मार्केट,बेस्ट बस डेपो.कोळीवाडा गावठाणे,झोपडपट्ट्या एसआरए बिल्डरला विकणाऱ्या सरकारला आम्ही चांगलेच ओळखतो.

अर्थात एसटी आंदोलन हे गरिबांच्या सार्वजनिक सुख सोयी देणाऱ्या जमिनी वाचविण्याचे आंदोलन आहे.सिडको क्षेत्रात असल्या भूमाफिया सिडको शिवसेना महाविकास आघाडीचा उच्चवर्णीय हिंदुत्वाचा, “मनुवादी राष्ट्रवादाचा” पराभव करणाऱ्या, दि बांच्या आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार प्रकल्पग्रस्त लढाऊ सागर पुत्रांची मदत, आझाद मैदानावरील एसटी कामगारांना मिळायला हवीच.किमान दि बांच्या कर्मभूमितील ऐतिहासिक पनवेल एसटी आगार भूमाफिया बिल्डरांचे आगर होऊ नये?जसे नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी ला विकण्यात आलेय.सामान्य शेतकरी कष्टकरी आणि सीमेवरच्या सैनिकांची लढाई ही मातृभूमीला आई मानूनच सुरू होते आणि त्या मातीत स्वतःला गाडून घेऊन संपते.“भारत माझा देश आहे ” असे शाळेत शिकून मोठे झालेल्या आमच्यासारख्या शेतकरी मच्छीमाराना त्या देशाचा सातबाराही माझाच असला पाहिजे.हा बुद्धिवादी प्रखर राष्ट्रवाद भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हास कुळ कायद्यांने दिला आहे.1 एप्रिल 1957 ला कुळ कायद्याचा घरे गावठाणे शेतजमिनी यांचा मालकी हक्क देणारा भारतीय राष्ट्रवाद सांगणारा त्यासाठी पाच हुतात्मे देणारा,स्वतःचे सारे जीवन आणि रक्त सांडणारा प्रखर राष्ट्रभक्त दि बा पाटील रायगडच्या भूमीत जन्मला आहे.

तरी, संविधानाचा समर्थक असा लढवय्या नेता उद्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खऱ्या शेतकऱ्यांचा पोशिंदा म्हणून जगात ही चमकायलाच हवा.या छत्रपतींच्या रायगडातील नवी मुबई विमानतळ प्रकल्पास, अदानी व्यापाऱ्यांचे मालकी हक्क मिळणे म्हणजे सुरतेच्या व्यापाऱ्यांनी छत्रपतींच्या गरीब रयतेस लुटण्यास सुरुवाय केलीय असेच म्हणावे लागेल.दि बा नसते तर ठाणे रायगड पालघर मुबई येथील आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार यांचे अस्तित्व संपले असते.आदरणीय नारायण नागु पाटील,Adv दत्ता पाटील आणि दि बांच्या विचारांना आदर्श मानूनच येथल्या समस्त सगरपुत्रांना घेऊन मुबंई परिसरात आमच्या घरा गावठाणाची मालकी हक्कांची लढाई उभी झालीय.वैदिक हिंदुत्वाने नाकारलेला जमीन मालकी देणारा संविधानिक राष्ट्रवाद मला दि बांच्या तत्वज्ञानात सापडला.
घरे गावठाणे नाकारणारी मुबई महानगर पालिका,सिडको आणि महाराष्ट्र सरकार हे भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन काम करीत असतील?.तर त्यांना संविधानिक मार्गानेच विरोध व्हायला हवा.अर्थात कुळ कायदा,गावठाण हक्क कायदा आणि भूमिहीन जमीन मालकास घरे जमिनी देणारे अनेक संघर्ष दिल्ली ते मुबई, देशात सुरू आहेत.संविधानाचा हा आधुनिक राष्ट्रवाद समजून घेऊन आपण सर्व शक्तीनिशी यात उतरावे अशी नम्र विनंती मी या लेखाद्वारे आपल्याकडे करतो आहे.

✒️सुलोचनापुत्र:- राजाराम पाटील(उरण,जिल्हा रायगड(संविधानिक राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते)८२८६०३१४६३