युवासेना ब्रम्हपुरी तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

    47

    ?हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन सप्ताह, महाराष्ट्रव्यापी रक्तदान शिबीर

    ✒️रोशन मदणकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.1डिसेंबर) :-शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना प्रमुख, पर्यावरण व पर्यटन मंत्री मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे , युवासेना सचिव मा.वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना कार्यकारणी सदस्य रूपेश दादा कदम साहेब, युवासेना चंद्रपुर जिल्हा विस्तारक नित्यानंदजी त्रिपाठी साहेब यांच्या सूचनेनुसार,युवासेना जिल्हा प्रमुख हर्षलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलिंद भणारे, शिवसेना शहर प्रमुख किशोर चौधरी माजी तालुका प्रमुख डॉ. सागर माकडे, नरेंद्र गडगीलवार, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चंद्रपुर जिल्हा युवासेना तर्फे ब्रम्हपुरी विधानसभा आयोजित रक्तदान शिबीरामध्ये 27 रक्तदात्यांनी ख्रिस्तानन्द रुग्णालय ब्लड बँक येथे रक्तदान केले.

    या प्रसंगी उपस्थितीमध्ये युवासेना तालुका प्रमुख आकाश शेंद्रे,युवासेना शहर प्रमुख अमोल माकोडे,युवतीसेना उपजिल्हा प्रमुख रेवती बालपांडे,युवतीसेना तालुका प्रमुख कविता घोरमोडे,शहर संघटक तेजस चौधरी,उपशहर प्रमुख आशिष गाडलेवार,अमोल ठिकरे,कवळू पिंपळकर,अनिकेत नेवारे,प्रमोद पिलारे,अक्षय कुशवा,पुरू नवघडे,कपिल मैद निलेश पिलार आधी युवासेना, युवती सेना पदाधिकारी, शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.