सुतार समाजाने ओबीसीचे नेतृत्व करणे गरजेचे आहे

43

ओबीसी मध्ये सुतार समाज लक्षवेधी आहे.समाज आणि समाजाशी, समाजाच्या उन्नतीसाठी,समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजात विविध प्रकारच्या सामाजिक संघटना, विविध प्रकारच्या सामाजिक संस्था स्थापन करण्यात येतात.संबंधित सामाजिक संघटना व सामाजिक संस्थेचे सामाजिक सर्वांगीण विकासात्मक दृष्टीने सामाजिक कार्याला गती प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारच्या सामाजिक जबाबदार पदांची निर्मिती करण्यात येत असते.सामाजिक पदांची निर्मिती ही प्रत्येक पातळीवर करण्यात येत असते जेणेकरून सामाजिक सर्वांगीण विकासासाठी योग्य नियोजन व्हावे अशी सामाजिक संघटना व सामाजिक संस्थेची व्यवस्थित सामाजिक बांधणी करण्यात येत असते.सुतार समाजाने ओबीसीचे नेतृत्व करणे गरजेचे आहे. असे का वाटते.संबंधित सामाजिक संघटना व संस्थेचे विविध प्रकारचे पदाधिकारी हे आपल्या पदाधिकारी वर्गातून जबाबदारी पुर्वक एका मुख्य प्रमुखांची योग्य निवड करतात आणि इतर सर्व जण आपापल्या प्रमुखांच्या आदेशानुसार सामाजिक कार्यात सहभागी होऊन सामाजिक विकासात्मक नियोजन करून सर्वच जण आपापल्या परीने हातभार लावतात.

सामाजिक संघटना व सामाजिक संस्थेचे सर्वच सामाजिक पदाधिकारी हे एक जबाबदार सदस्य म्हणून सामाजिक कार्यची धुरा सांभाळलतात. तळागाळातील, उपेक्षित, गरीब व आर्थिक दृष्टीने कमकुवत, सुशिक्षित बेरोजगार युवक आणी खेड्यातील समाज बांधवांना गृहीत धरून सदरचे कामकाज व्यवस्थित चालते.
सामाजिक सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे हे सर्वच पदाधिकारी मान्यवरांची सामाजिक जबाबदारी असते, सामाजिक कर्तव्य असतं, सामाजिक जाणीव व सामाजिक भान बांधिलकी देखील असते.समाजात सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणे हे देखील महत्वाचे ठरते.समाजात वावरताना सर्वसमावेशक समन्यायी भूमिकेत वावरावे लागते ती जबाबदारी स्वीकारली जाते सर्वांची एकच भुमिका असते ती म्हणजे समाजहित, सामाजिक सर्वांगीण विकास समाजात आर्थिक परिस्थिती मजबुत करण्यासाठी एक विकासात्मक नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा सामाजिक जबाबदारी म्हणता येईल आणि तो एक सामाजिक सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा मुद्दा असतो ती जबाबदारी सुद्धा इमानदारी पुर्वक पार पाडली जाते असे मला अडाणी सर्वसामान्य सुतार बांधवाला मनापासून वाटते.हा सामाजिक लेखन प्रपंच माझ्या अल्पबुद्धिनुसार,अडाणी बुद्धिनुसार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या बाबतीत विचारवंत, सुशिक्षित कर्तवदक्ष, तडफदार व्यक्तिमत्त्व यांचे मतमतांतरे असु शकतात. म्हणूनच सुतार समाजाने ओबीसीचे नेतृत्व करणे गरजेचे आहे.

सामाजिक संस्थांनी व नेत्यांनी आपला समाज संपर्क वाढविण्या सोबतच समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व होतकरू समाज बांधवांचा एक समाज सर्वे करून किती बांधव बेरोजगार आहेत व किती बांधव होतकरू आहेत व आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने ते व्यवसाय करू शकत नाहीत. अशी आकडेवारी तयार करून या समाज बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात व व्यवसाय उभारणीसाठी मदत करावी जेणेकरून समाज संपर्क साधल्याचा समाज कल्याण म्हणुन समाज उपयोग होईल
अस मला वाटतं रोजगार उपलब्ध होईल व व्यवसाय सुरु होतील समाज स्वावलंबी बनेल हे सत्य आहे.सुतार समाजाने ते स्वीकारले तर सुतार समाज ओबीसीचे नेतृत्व करू शकतो.ओबीसी समाजाच्या जनआंदोलनात ओबीसी सुतार समाजाची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे.ओबीसी समाजाचं जनआंदोलन उभे करण्यात येत आहे या ओबीसी जनआंदोलनाला ओबीसी सुतार समाजाचा सहभाग नोंदवला जाण्यासाठी ओबीसी सुतार समाजाची उपस्थिती जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित असणे गरजेचे आहे. इतर काही ओबीसी संघटना ओबीसी जनआंदोलन उभे करतात आणि त्यामध्ये ओबीसी सुतार समाजाचं ओबीसी म्हणुन योगदान किती प्रमाणात असते याचा विचार ओबीसी सुतार नेतृत्वाने करणे गरजेचे आहे.

ओबीसी जनआंदोलन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओबीसी सुतार मानसिकता तयार करणे आवश्यक आहे.त्यासाठी समाज जागृती निर्माण करण्यासाठी ओबीसी जनजागृती अभियान राबविण्यात आले पाहिजे त्यासाठी राज्यभरात ओबीसी नेत्यांनी राज्यभरात समाज जागृती अभियान राबविण्यात यावे.इतर काही ओबीसी संघटना ओबीसी जनआंदोलन उभारताना दिसतात तसा प्रयत्न ओबीसी सुतार नेत्याकडून होतांना दिसत नाही सुतार समाजाच्या नेत्यांनी तो करावा.ओबीसी जनआंदोलनात ओबीसी सुतार समाजाचं योगदान किती व ओबीसी जनआंदोलन स्थळी ओबीसी सुतार समाजाची उपस्थिती किती संख्येने असते. याची खरी आकडेवारी समोर आली पाहिजे.इतरांच्या कार्यक्रमात स्वतःचं योगदान देणे गरजेचे असते त्याशिवाय त्याच्या यशाचे श्रेय आपण घेण्यासाठी अधिकार प्राप्त ठरु शकत नाही.

सामाजिक जनआंदोलन, सामाजिक वैचारिक मेळाव्यात श्रेयाचे वाटेकरी ठरण्यासाठी, त्या कार्यक्रमाचे श्रेय घेण्यासाठी आपला मोठा सहभाग नोंदवला जाणे आवश्यक व अपेक्षित असते आणि राहील यात शंकाच नाही.ओबीसी जनआंदोलन व ओबीसी सुतार समाज सहभाग.ओबीसी बद्दल सामाजिक ओबीसी सुतार सामाजिक वैचारिक मंथन झाले पाहिजे.राज्यातील विश्वकर्मीय सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या किती आहे व किती जण रोजगारा पासून वंचीत आहे याची आकडेवारी जमा करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची रोजगाराची व्यवस्था करण्यात आली तर समाजातील काही प्रमाणात आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होईल इतर अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात सत्कार समारंभ उत्साहात संपन्न होतात. मला वाटतं सध्याच्या परिस्थितीत समाजातील रोजगाराच्या बाबतीत सामाजिक संस्था यांनी एक सर्व्हे करून ज्यांना गरज आहे त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत व ज्यांची इच्छा व्यवसाय सुरू करण्याची असेल त्यांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले पाहिजे.तरच आपला समाज थोडा फार आर्थिक परिस्थितीने मजबूत होईल.हे जरी काम केले तरी सुशिक्षित बेरोजगार तरुण व समाज बांधवांना नेहमीच आपल्या सामाजिक संस्थेची मनापासून आठवण स्मरणात राहील असा विश्वास वाटतो.

समाजाचा समाज डाटा असला पाहिजे.तो आहे माझ्या माहिती नुसार आहे.पण तो फक्त राजकीय फायद्यासाठी वापरला जातो.समाज डाटा कशासाठी, कोणत्या कामासाठी, त्याचे कारण काय, त्याचा उपयोग कोणता, त्याचा समाजाला उपयोग काय, उपयोग कोणत्या प्रकारचा असू शकेल. समाज डाटा सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय दुष्ट्या लाभ मिळविण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी सुतार समाजाच्या तरुणांनी,कार्यकर्ते,नेते,पत्रकार, साहित्यिक यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला पाहिजे.एक सुतार समाज बांधव म्हणून मी माझे मत व्यक्त करतो.इतर समाज सुशिक्षित होतो,संघटीत होतो.नंतर संघर्ष करतो.आपल्या सुतार समाजाचे काय?. राजकीय नेते खूप आहेत.त्यांचे स्वताचे अतित्व कुठे आहे.कामगार,कर्मचारी अधिकारी किती आहेत.कुठे आहेत.त्यांना एकत्र कसे करता येईल याचा सामाजिक बांधिलकी म्हणून विचार झाला पाहिजे.जे माझ्या मनात होते ते मी बिनधास्तपणे आपल्या समोर मांडले त्यावर आपण निर्भीड,निपक्षपाती प्रतिकीर्या द्याला ही अपेक्षा ठेवतो.

जय विश्वकर्मा, जय संत भोजलींग, जय संविधान

✒️प्रमोद सुर्यवंशी(चिखली,मातृतीर्थ बुलडाणा)मो:-८६०५५६९५२१