आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांमुळे ९ महिन्याच्या चिमुकल्यावर मोफत शस्त्रक्रिया !

61

🔹३ लक्ष ५० हजार रुपयांची मोफत शस्त्रक्रिया ; बोंद्रे कुटुंबाला मिळाला दिलासा !

✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वरुड(दि.1डिसेंबर):-मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतांना दिसून येतात. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. अशीच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी सहकार्य करतांना दिसत आहे.वरुड तालुक्यातील नागझिरी येथील शिवराज यशवंत बोंद्रे या ९ महिन्याच्या चिमुकल्याला लहानपणापासून धाप लागणे व छातीत धडधडणे यामुळे त्रस्त असलेल्या नागझिरी येथील ९ महिन्याच्या चिमुकल्यावर आमदार देवेंद्र भुयार यांच्या रुग्णसेवेमुळे तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाल्याने आर सी सी हॉस्पिटल हाजी अली मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली या मोफत शस्त्रक्रियेने या चिमुकल्याला नवे आयुष्य मिळाले .

९ महिन्याच्या शिवराजला हृदयाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याकरिता ३ लक्ष ५० हजार रुपयांचा खर्च होणार असल्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क केला असता आमदार देवेंद्र भुयार यांनी शीवराज च्या तब्बेतीची दखल घेऊन क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मुंबई येथील एस आर सी सी हॉस्पिटल हाजी अली मुंबई येथे ऍडमिट करून ३ लक्ष ५० हजार रुपयांची हृदयाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून ९ महिन्याच्या शिवराजला मुंबई येथील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले. आता शिवराज पूर्ण ठणठणीत बरा होऊन बोंद्रे कुटुंबाला दिलासा मिळाला. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे बोंद्रे परिवाराने आमदार देवेंद्र भुयार, रुग्णसेवक पंकज ठाकरे यांचे आभार मानले.