हारडप येथे महिला ग्रामसभा संपन्न

  37

  ✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड)मो:-9373868284

  हदगाव(दि.2डिसेंबर):- तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय हारडप यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सरपंच सौ.वंदना वाठोरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २९/११/२१ रोजी सकाळी ११ वाजता स्वतंत्र महिला ग्रामसभा घेण्यात आली

  गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या विकास कार्यक्रमात महिलांचाही सहभाग असावा म्हणून महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक केले आहे. महिला ग्रामसभेला जरी हजर असल्यातरी पुरुषांपुढे बोलण्यास तसेच आपली मते मोकळे पणाने न मांडण्यामागे त्यांच्यावर मानसिक दबाव असतो.
  त्यामुळे महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेऊन त्यांनी खुली चर्चा करून त्यांचे प्रश्न/ समस्या मांडल्या पाहिजेत व त्याप्रमाणे त्यांच्या हिताचे व सोईस्कर निर्णय त्यांना घेता आले पाहिजेत.या अनुषंगाने हरडफ येथे स्वतंत्र महिला ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत ग्रामपंचायतींतर्गत केलेल्या कामांचा आढावा व करावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीकडे असलेल्या विविध योजना, महिलांसाठी अत्यावश्यक असलेली विकास कामे, ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

  निरोगी आरोग्यासाठी घेवयाची काळजी, किशोरवयीन मुलीच्या समस्या व त्यावरील उपाय व काळजी गावामध्ये डॉक्टरांना स्वतंत्र खोली उपलब्ध करून देण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली. गावातील दोन्ही स्वस्त धान्य दुकान यांच्याकडून घेतलेल्या मालाची पावती देण्याचे ठरले आहे पिण्याच्या पाण्या विषयी चर्चा करण्यात आली शिक्षण आणि आरोग्य या विषयावर अनेक महिलानी चर्चा केली.गावच्या विकासासाठी ह्या महिला मोठ्या संख्येने पुढे आल्याने गावातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात या महिलांच अभिनंदन कौतुक होत आहेत

  यावेळी ग्रामसेवक कनकापुरे सरपंच सौ.वंदना वाठोरे उपसरपंच बालाजी सूर्यवंशी सदस्य आकांक्षा वायवळ अस्मिता सुर्यवंशी सुनिल पाटील तानाजी मोरे राजुभाऊ मोरे साईनाथ पाटिल जि.प.प्रा.शाळेचे मुख्यध्यापक व सर्व शिक्षक आरोग्य विभागाचे कर्मचारी सिस्टर आरोग्य सेवक आशा वर्कर अंगणवाडी सेविका व मदतनीस दोन्ही स्वस्त धान्य दुकानदार ग्रामसंघ अध्यक्ष. सौ.आकांक्षा वायवळ सचिव.स्मिता सुर्यवंशी कोषाध्यक्ष मंगल वाठोरे आनिता शिंदे आशा वाठोरे.व गावांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.