दारूची बाटली पोटात घुसली, शिंगवे येथे तरुणाचा खून

37

🔺दारूची बाटली जीवावर उठली

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.3डिसेंबर):- निफाड तालुक्यातील शिंगवे येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या दोन मजुरामध्ये गावात खंडेराव मंदिर परिसरात दारूची बाटली दिली नाही म्हणून वाद झाला गुरूवार दिनांक २ रोजी शिंगवे येथे हा प्रकार घडला याप्रकरणी  सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू काद्री यांनी अधिक माहिती दिली की शिंगवे येथे गुरुवारी बाजार असतो या दिवशी खंडेराव मंदिराजवळ संशयित आरोपी दिलीप निवृत्ती पवार याने दत्तू चंदर अष्टेकर (३२) याच्याकडे दारूची बाटली मागितली पण त्याने न दिल्याने या दोघांत भांडण झाले व भांडणाचे रूपांतर धक्का बुक्कीत होऊन भांडणाच्या वादात हातातील दारूची बाटली दत्तूच्या पोटात घुसल्याने त्यातच दतु अष्टेकरचा मृत्यू झाला.

सदर घटनेचा ३०२ कलमा प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी दिलीप निवृत्ती पवार यास अटक करण्यात आली आहे सह्हायक पोलिस निरीक्षक पप्पु काद्री यांनी सांगितले.शिंगवे येथील खुनाची माहिती मिळताच निफाड उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ तांबे व सायखेडा सह्हायक पोलिस निरीक्षक पप्पू काद्री यांनी घटनास्थळी धाव घेतली.तसेच या घटनेची माहिती घेऊन पी एस आय गणेश आखाडे,पोलिस कर्मचारी विकास गिते, तेलोरे,निकम,अधिक तपास करत आहे.