जातीयवादी मुख्याध्यापक केंडे यांच्यावर बीड जिल्हा शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करावी नसता वंचित बहुजन आघाडी तोडांला काळे फासणार–विवेक कुचेकर

    44

    ✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

    बीड(दि.3डिसेंबर):- तालुक्यातील पिपंळगाव वाडवाणा येथील भाई उध्दवराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे अनाधिकृत मुख्याध्यापक विनयकुमार केंडे यांनी संविधान दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना पायात चप्पल घालुन अभिवादन केले असल्याने आंबेडकरी जनतेत प्रचंड चिड निर्माण झाली असुन जातीयवादी मुख्याध्यापक केंडे यांच्या विरूध्द शिक्षण संस्थेने कायदेशीर कारवाई करावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्या विरोधात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करून तोडांला काळे फासणार असल्याचे ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते तथा लोकराजा छञपती शाहू महाराज विचार मंच संस्थापक अध्यक्ष विवेक( बाबा )कुचेकर यांनी दिला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की,
    खाजगी शिक्षण संस्था चालवणारे व स्वताला पुरोगामी म्हणवणारे जातीयवादी माजी आमदार भाई जनार्दन तुपे यांच्या शाळेतील स्वताला शिक्षणतज्ञ समजणारया मुख्याध्यापक विनयकुमार केंडे यांचे अनेक प्रकरणे बाहेर निघत असुन संविधान दिनी महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत असताना पायात चप्पल घालुन अभिवादन करत असल्याचा फोटो सध्या वायरल होत असल्यामुळे आंबेडकरी जनतेत या मुख्याध्यापका व शिक्षण संस्थे विषयी प्रचंड चिड निर्माण झाली असल्यामुळे बीड जिल्हा शिक्षण विभागाने याची तवरीत दखल घेवुन मुख्याध्यापक विनयकुमार केंडे याच्यावर कायदेशीर कारवाई करावी व तसेच सदरील मुख्याध्यापकाला ओपन केटीग्रिरीचा असताना देखील शिक्षण संस्थेने अनुसुचित जागेवर नियुक्ती देवुन मागासवर्गीय पदाचा घोर अपमान केलेला आहे तरी बीड जिल्हा शिक्षण विभागाने याची सखोल चौकशी करून मुख्याध्यापक केंडे वर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ञीव स्वरूपाचे आंदोलन करून मुख्याध्यापक केंडेच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते तथा लोकराजा छञपती शाहू महाराज विचार मंच संस्थापक अध्यक्ष विवेक (बाबा )कुचेकर यांनी दिला आहे