चैत्यभूमी ला यावं की नाही ??

36

आज देशभरातील भीम अनुयायांना प्रश्न पडलाय की आपण 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीला बाबासाहेबाना परिनिर्वान दिनी अभिवादन करण्यासाठी यावे किंवा नाही .बाबासाहेबांचे नातू वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनि आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले आहे की यावर्षी रेल्वे पूर्णपणे चालू नाहीत, ST बंद आहे आणि कोरोना चा नवा व्हेरियन्ट ओमीक्रोन देशात आल्यामुळं आरोग्यासाठी धोका होऊ शकतो म्हणून घरूनच अभिवादन करावे .त्याउलट रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला आवाहन करताना म्हटलं आहे की 2 वर्षांपासून आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यापासून वंचित आहेत आणि तिसरे वर्ष सुद्धा हे सरकार आपल्याला वंचित ठेऊ पाहत आहे त्यामुळं चैत्यभूमी वर जनता येणार आणि येणारच.त्यानंतर बाबासाहेबांचे पणतू आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलं की भीम अनुयायांनी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी ला यावे त्यांना सरकार अन महानगरपालिका सेवा पुरविणार नसेल तर आम्ही आबेडकर कॉलेज च्या कॅम्पस मध्ये त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करू .

आता सरकार नेमकं काय म्हणतंय ??
सरकार ने जी आर काढून म्हटलं आहे की ओमीक्रोन व्हायरस च्या प्रदुभाव असल्या करणे चैत्यभूमी सर्वसामान्य लोकांनि येऊ नये शासकीय व अति महत्वाच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल .त्याचबरोबर मास्क,लसीचे 2 डोस व थर्मल टेस्टिंग शिवाय प्रवेश नाही .परंतु पुस्तक विक्री व इतर आंबेडकरी साहित्य विक्रीसाठी पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.सरकार शिवाजी पार्क ला अनुयायांसाठी राहण्याची ,शौच अंघोळ व जेवणाची कुठलीही व्यवस्था करणार नाही .

आता आपला स्टँड काय असावा.खरं तर आरोग्यासाठी धोकादायक असेल तर आलं नाही पाहिजे परंतु कोरोना खर्च आहे की हे सगळं षडयंत्र आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे .मी मागील 2 वर्षापासून सातत्याने मुंबई पुणे औरंगाबाद आशा मोठ्या शहरात बस रेल्वे आदीने प्रवास करत आहे मला एकदाही कोरोना नाही झाला किंवा तसे लक्षणं आढळली विशेष म्हणजे मी लस सुद्धा नाही घेतली तरीही मला आजपर्यंत एकदाही संसर्ग झालेला नाही .परंतु मास्क सॅनिटायसर ही काळजी नक्कीच घेतली आहे .माझं व्ययक्तिक मत विचारलं तर मी म्हणेल की मी चैत्यभूमी ला जाणार -मास्क सॅनिटायसर आणि आरोग्यासाठी सर्व काळजी घेऊन जाणार .कारण यानिमित्ताने तिथे चळवळीच्या साथीची भेट होते ,वैचारिक देवाणघेवाण होते ,आंबेडकरी चळवळीची ध्येय धोरणे ठरवले जातात .कोणत्या जिल्ह्यात कुठं अन्याय अत्याचार झालाय याची इत्यंभूत माहिती मिळते.त्या अनुषंगाने चळवळीची दिशा ठरवली जाते.
चळवळीचे कार्यकर्ते चैत्यभूमी ला फक्त पाया पडत नाही तर एक नवीन संकल्प करून एक अनोखी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातात आणि त्याच ऊर्जेने वर्षभर आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात .
दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सरकार मग ते भाजप असो की महाविकास आघाडी दोन्हीही प्रखर जातीयवादी आहेत यावर माझी खात्री पटलेली आहे .त्यांना देशात मनुवाद पुन्हा आणायचा आहे त्यामुळं ते अपल्याला बाबासाहेबानी सांगितलेल्या त्रिसूत्री म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्री पासून परावृत्त करण्यासाठी पूर्ण ताकत लावत आहे त्यात पुस्तकाचे स्टॉल न लावून ज्ञानार्जन पासून वंचित ठेवत आहे.

त्यानंतर संघटित होऊ नये म्हणून कोरोनाचे नियम याचवेळी कडक केलेत जसे 500रु मास्क न घातल्यास फाईन ,जमावबंदी,रेल्वेच्या प्रवास 2 डोस घेतले नाही म्हणून नाकारणे आणि चैत्यभूमी स अभिवादनासाठी मज्जाव करणे .उरला प्रश्न संघर्ष करण्याचा जिथं 2 वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलं आता ज्ञानार्जन पासून वंचित ठेवलं अन संघटीत होऊ दिला नाही तिथं संघर्ष कुठून होणार ??

देशात कायद्याचे राज्य नसून असमानता झुंडशाही व पोलीस यंत्रणेचा सर्वसामान्य जनतेवर गैरवापर करून दमनशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत .संविधानाच्या सर्व मूल्यांचे अवमूल्यन करत हे भ्रस्ट सरकार नागरिकांवर अन्याय करत आहे.याविरोधात एक आंबेडकरी अनुयायी म्हणून आवाज उचलणे गरजेचे आहे त्यासाठी रणनीती करणे गरजेचे आहे त्याचसाठी एकमेकांना भेटणे संघटीत होणे आणि संघटित कृती करणे आवश्यक आहे .

आंबेडकरी समाज एवढा जागृत आहे की 6 डिसेंबर ला अभिवादन करण्याबरोबरच अतिशय नवनवीन उपक्रम हाती घेतो त्यात 22 प्रतिज्ञा अभियान, अट्रोसिटी कायदा जनजागृती ,एक वही एक पेन अभियान,नाशमुक्त अभियान आणि संविधान जनजागृती अशे विविध उपक्रम जे चळवळ समृद्ध करत असतात लोकांचे ज्ञान वाढवतात लोकांना योग्य दिशेकडे चेतवतात आणि आपल्या एकंदर विकासाचे दार खुले करतात .म्हणून या नानुवादी प्रवृत्ती ला हे खुपतंय म्हणूनच याना एकादशी ला लाखो लोक चालते,बाजूलाच सिद्धिविनायक रोज प्रचंड गर्दीने सुरू आहे .राजकिय सभा कोव्हिड नियमांचे उल्लंघन करून खचाखच भरलेल्या चालतात .मंत्री संत्री बिना मास्क बिनधास्त हिंडतात .मग सर्वसामान्य जनतेलाच एवढी भीती दाखवून हे काय करु इच्छित आहेत ???

तर हे आपल्याला आपल्या चळवळीला दमन करू इच्छित आहेत .अन्याय अत्याचाराविरोधात बोलल्यामुळे अनेकांकर ठीक ठिकाणी केसेस लावल्या गेल्या.प्रबोधन करणाऱ्यांच्या आर्थिक मुसक्या आवळल्या. गरिबांच शिक्षण हिसकावून घेतलं आणि जनतेलाच पंगू बनवलं जेणेकरून ह्या भ्रस्ट जातीयवादी मनुवादी लोकांना सुखरुप पणे आपल्यावर गुलामी करता येईल .आपण चैत्यभूमी ला कुठल्याही आमंत्रण दिले म्हणून जात नाही तर कृतज्ञता म्हणून जातो .आणि हेच मनुवाद्यांना खुपते म्हणून आपण गलिच्छ आहोत घाण करतो ,कचरा होतो आशा वल्गना करतात .म्हणून मित्रानो मी चळवळीचा कार्यकर्ता असल्याने मी तर येणार तुम्हीपण या आणि आल्यावर भेटायला विसरू नका .तुमच्यासाठी मी अट्रोसिटी ऍक्ट च्या प्रति छापल्या आहेत त्या घरी घेऊन अभ्यासा जेणेकरून तुमचे हक्क अधिकार कुणी जातीयवादी छिणून घेण्याची हिम्मत करणार नाही .

नमो बुद्धाय -जय भीम- जय संविधान

✒️दादाराव नांगरे(एक सर्वसामान्य भीम अनुयायी)मो:-7977043372