हदगाव लसीकरण केंद्रा मधील संगणक ऑपरेटर बदलण्याची मनसेची मागणी

31

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव नांदेड)मो:-9373868284

नांदेड(दि.3डिसेंबर):-covid 19 चा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे कमी झाला नसून आरोग्य विभागाकडून नागरिकांना लसीकरण करण्यासंदर्भात जनजागृती करत आहे.तर हदगाव रुग्णालायात लसीकरण केंद्रातील संगणक ऑपरेटर लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अभद्र भाषेत बोलत असल्याचे नागरिकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना कळवले होते.तर त्याची शहानिशा करण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांच्या सूचनेनुसार मनसेचे पदाधिकारी स्वतःहून लसीकरण करण्यासाठी गेले असता संगणक ऑपरेटर आणी त्यांच्या सोबत असलेले लस देणारे काही मुले यांची टिंगल टवाळ्या आणी वर्तणूक योग्य नसल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांना दिसून आले.

महिला, मुली समोर असे प्रकार घडत असल्यामुळे लसीकरण करण्यासाठी आलेले नागरिक लसीकरण न करता लसीकरण केंद्रातून जातांना आमच्या निर्देशनास आले. दि.1डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैधकिय अधिकारी डॉ. ढगे साहेब यांना संपर्क केला असता त्या वेळेस रुग्णालयात ऑपरेशन चालू असल्यामुळे संपर्क झाला नसल्यामुळे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वैधकिय अधिकारी यांना निवेदन देऊन लसीकरण केंद्रातील संगणक ऑपरेटर यांच्या जागी तत्काळ दुसऱ्या ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन दिले आहे.आणी या निवेदनात शहरात आणी तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळेल आणी शासनाचे 100% लसीकरण मोहीम यशस्वी होईल असा सुध्दा मजकुर लिहलेले दिसून येते. निवेदनाची योग्य ती दखल न घेतल्यास रुग्णालया समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .या निवेदनावर शहराध्यक्ष शैलेश शिरफुले, रोहीत पंचमवार,सुयोग व्यावहारे,अविनाश देशमाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .