चिखली येथील सांडपाण्याची व्यवस्था मार्गी लागताच प्रहार घेतले आंदोलन मागे

  42

  ?ए पी आय मंगेश मोहोड यांच्या प्रयत्नाला आले यश

  ✒️नितीन पाटील(नेरी प्रतिनिधी)

  नेरी(दि.3डिसेंबर):- ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात मागील सहा महिन्यांपासून नेरी ग्रामपंचायत अपयशी ठरल्यामुळे प्रहार संघटनेने आंदोलनाचा पावित्रा घेताच तहसीलदार व पोलीस स्टेशनची परवानगी घेताच ग्रामपंचायतीने पोलिसांकडे धाव घेत चिखली गावाची सांडपाण्याची समस्या ए पी आय मंगेश मोहोड नेरी पोलीस चौकी यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागली समस्या मार्गी लावण्यात त्यांना यश प्राप्त झाले.

  नेरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील कैलास सोनवणे यांचा घरातील आणि सांडपाणी उघड्यावर वाहत होते त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते याबद्दल अनेकदा ग्रा प नेरीला तक्रारी दिल्या होत्या पण त्यांनी दखल घेतली नाही तसेच आरोग्य विभागाने सुद्धा ग्रा प ला सांडपाण्याची बंदोबस्त करावे असे पत्र दिले होते तरी सुद्धा त्यांनी मौका चौकशी करून या समस्या कडे दुर्लक्ष केले होते तेव्हा दिलीप सोनवणे यांनी प्रहार संघटनेला ही बाब सांगताच प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी तात्काळ दखल घेत ग्रा प ला आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि तहसीलदार व पोलीस विभाग याना आंदोलनासाठी परवानगी मागितली तेव्हा ग्रा प जागी झाली.

  आणि पोलिसांना माहिती दिली तेव्हा नेरी चौकीचे ए पी आय मंगेश मोहोड यांनी चिखली गावात जाऊन कैलास सोनवणे आणि नागरिकांना समजावून सांडपाण्याची समस्या मार्गी लावली त्यामुळे प्रहार संघटनेनी आंदोलन मागे घेतले ए पी आय मंगेश मोहोड साहेबानी केलेल्या कामगिरी मुळे शांततेत समस्या सुटल्यामुळे सर्वच स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.