‘स्व. सतीश मित्तल’ पुरस्काराने दिलीप पाटील सन्मानित…

42

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.3डिसेंबर):– येथील प्रा.डी.आर.पाटील यांना दि. 3 जानेवारी 2022 रोजी आष्टी जिल्हा बीड येथे इतिहास संकलन संस्थेच्या अधिवेशनात ‘स्व सतीश मित्तल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, इतिहास क्षेत्रात काम करीत असताना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. इतिहास संकलन समितीचे भूतपूर्व अध्यक्ष स्व. डॉ सतीश मित्तल यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. पाचोरा येथील स्व. परशुराम कोंडीबा शिंदे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार या वर्षी धरणगाव येथील दिलीप रामू पाटील यांना घोषित झाला आहे.

निवड समिती मध्ये नगर चे प्रा.डॉ.राधाकृष्ण जोशी, बीड चे प्रा.डॉ.मुकुंद देवर्षी, संभाजीनगर चे प्रा.व्यंकटेश लांब, जळगाव च्या भारती साठे मॅम आणि अमरावती चे प्रा.नितीन सराफ यांचा समावेश होता. दिलीप रामू पाटील यांचे चाळीस वर्षाचे संघटनात्मक योगदान, अभाविप ते सहकार भारती व्हाया किसान संघ, तरुण भारत, जळगाव जनता बँक, बालाजी विश्वस्त मंडळ धरणगाव आदी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम सिनेट सदस्य आहेत ते व्यवस्थापन परिषद सदस्य, एक कार्यकर्ता ते उत्तम प्रशासक असा हा प्रवास संघर्ष आणि सृजनशीलतेचा आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र ,संस्थेचे स्मृतीचिन्ह असे आहे. पुरस्काराची सदर माहिती ही संकलन समितीचे प्रांत संघटक रविंद्र पाटील यांनी कळवली आहे.