रोटी फाउंडेशनच्या वतीने नायगांवात जागतिक दिव्यांग दिन उत्साहानं साजरा

62

✒️नायगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नायगांव(दि.4डिसेंबर):-नांदेड – नायगांव बाजार ) राज्याचे दुसरे माजी मुख्यमंत्री स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू डॉ. रोहीत दादा माडेवार व सौ टिशाताई यांचे अत्यंत विश्वासू म्हणून परिचित असलेले‌, तथा रोटी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर यांचा मदतीचा यज्ञ नित्याने सुरू आहे, मराठवाड्याच्या मदतीच्या यज्ञात शिवानंद पांचाळ हे नांव अनेकदा दिसून येतं आहे, कोणाचा सन्मान असो, किंवा बेवारस मनोरुग्ण असो, किंवा दारात कोणीही नडलेला आला तर शिवानंद पांचाळ ची मदत होणारच… ध्येयवेडा माणुसकी जपणारा कार्यकर्ता शिवानंद च्या सर्वच गोष्टीचा उल्लेख कमी शब्दात करता येणार नाही, अपंग-दिव्यांग दिन ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जाहीर केला गेला ३ डिसेंबर हा दिवस नायगांव येथे सुद्धा रोटी फाउंडेशन भारत – मराठवाडा अध्यक्ष शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी या दिवसाच्या औचित्यावर दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा म्हणून शहरातील दिव्यांग बांधव अशोक संभाजी वन्ने यांचा आपुलकीने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन व मिठाई चे वाटप करून त्यांचा सत्कार व गौरव केले, आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याची प्रशंसा केली, यावेळी विठ्ठल बळीराम सोंनटक्के, गोविंद पोतदार तळणीकर, गौतम भाऊ वाघमारे, सचिन फुलारी, प्रकाश वाघमारे, सुभाष पांचाळ, संभाजी पांचाळ, अशोक सेठ, राजपाल सोनटक्के, रोटी फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील बांधव उपस्थित होते, दिव्यांग बांधव अशोक संभाजी वन्ने दोन्ही पायांनी अपंग असतानाही लढण्याची जिद्द कायम ठेवत जवळपास गेल्या ऐकेचाळीस वर्षांपासून नायगांव शहरातील दत्तनगर येथे टायर पंम्चर चे काम करतात ते स्वतः सर्व छोटे मोठे वाहन टुव्हीलर गाडी चे टायर पंम्चर जोडण्यापासुन ते टायर खोल फिंटीग पर्यंत आदी काम करून परिवाराचा उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहेत, अशोक संभाजी वन्ने हे बांधव दोन्ही पायांनी अपंग असतानाही व अनेकांसाठी आदर्शवत ठरणारे आहेत.

मनात लढण्याची ताकद जिंकण्याची जिद्द आणि स्वाभिमान असेल तर जीवन जगणे सहज सोपे होते, अशी शिकवण जणू त्यांनी अनेकांना दिली आहे, अपंगांना समाजात मानाचे स्थान मिळावे, आपण जे करू शकतो, ते सर्व काही तेही करू शकतात म्हणूनच त्यांना सहानुभूतीची नाही तर आपुलकीची गरज आहे, कोणताच दिव्यांग बांधव कमकुवत नसतो, त्याच्याकडे अफाट अशी उर्जा असते फक्त आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून त्यांना बळ देण्याचं काम आपण सर्वांनी केले पाहिजे, दिव्यांग व गरीब गरजू मध्येच देव आहे, समजून मी सामान्य माणसाला आधार देण्यासाठी रोटी फाउंडेशनच्या वतीने छोटासा प्रयत्न करत आहे, शंभर टक्के समाजकारण हा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा वारसा घेऊन काम करत आहे असे मत रोटी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले