नारायणगाव खेरवाडी येथे जागतिक अपंग दिन साजरा

34

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.4डिसेंबर):- निफाड तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथे शुक्रवार दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन खेरवाडी ग्रामपंचायत मध्ये सादर करण्यात आला. त्यावेळी अपंग बांधवांना विषयी कृतज्ञता व्यक्त करत , प्रत्येक दिव्यांग बांधवांना गुलाबपुष्प व डजबिन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ऑनलाइन सर्टिफिकेट असणाऱ्या 22 दिव्यांगांच्या खात्यावर ग्रामपंचायत मधून मिळणारा पाच टक्के निधी वर्ग करण्यात आला.

यावेळी ग्राम विकास अधिकारी दहिफळे भाऊसाहेब, सरपंच अश्विनी ताई जाधव. उपसरपंच विजू मामा लांडगे, ग्रामपंचायत सदस्य सोपान संगमनेरे, पप्पू उगले, किसन लांडगे ,भाऊसाहेब नी पुंगळे , भाऊसाहेब लगड (अण्णा)तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व पत्रकार बाळासाहेब आहेर उपस्थित होते . पहिल्यांदाच गावामध्ये अशा पद्धतीने जागतिक अपंग दिन साजरा केल्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने सर्वांचे .रुद्रा अपंग संघटना नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष भारती संतोष लगड यांनी आभार मानले