कृषीमंत्री दादाजी भूसे यांना सिंचनाच्या सोई व पिकांचे संवर्धनासाठी विविध योजना राबविण्याची शिवसेनेची मागणी

    80

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.5डिसेंबर) :-अवकाळी पावसामुळे धान पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे सदर नुकसानीची शेतकर्‍याच्या बांध्यावर प्रत्यक्षात पहाणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे हे चंद्रपूर येथील दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांचा ताफा नागभीड येथे शिवसेनेच्या वतीने थांबविण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने ब्रम्हपुरी, नागभीड व चिमूर तालुक्यातील धान पिक व इतर पिकासाठी आवश्यक सिंचनाच्या सोई व पिकांचे संवर्धनासाठी शासनाच्या विविध कल्यानकारी योजना राबविण्याची मागणी करणारे निवेदन प्रषित केले.

    चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, नागभीड, व चिमूर तालुक्यात खरीप हंगामाच्या वेळी अनेक वेळा पावसाने दडी मारल्याने पिक करपल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून मागेल त्याला सिंचनाच्या सोईं यात शेततळे, धडक योजना विहीर व इंधन विहीर यासारख्या योजना सक्तीने राबविण्यात याव्यात. तसेच पिकांचे जंगली प्राणी बंदरे, डुक्करे व इतर प्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी सौर ऊर्जा कुंपन योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र यांनी महाविकास आघाडी सरकारमधील महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्याकडे प्रेषित निवेदनातून केली. तसेच शेतकर्‍यांच्या विविध समस्येविषयी प्रा.नखाते यांनी कृषीमंत्र्यांशी संवाद साधला. प्रसंगी शिवसेनेचे शेतकरी नेते नितीन मत्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

    निवेदन देतेवेळी शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ.रामेश्वर राखडे, केवळराम पारधी सरपंच, सोंदरी तथा उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी, अनिल नंदेश्वर, जीवन सहारे, विक्की मडकाम माजी शहरप्रमुख नागभीड, श्रीहरी सातपूते तालुका प्रमुख चिमूर, अमित अमृतकर विभागप्रमुख नागभीड, गिरीश नवघडे उपतालुका प्रमुख नागभीड, नाजीम शेख युवासेना समन्वयक नागभीड, मनोज वाढई उपतालुका प्रमुख नागभीड, भोजराज ज्ञानबोनवार तालुका प्रमुख नागभीड, मनोज लडके, उपतालुका प्रमुख नागभीड, श्रीकांत पिसे शहरप्रमुख नागभीड व बंडू पांडव उपतालुका प्रमुख नागभीड आदी. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते._