खा.रजनी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी विद्यालय व बुखारी शाळेत मास्क वाटप

    37

    ✒️विशेष प्रतिनिधी/समाधान गायकवाड

    माजलगाव(दि.5डिसेंबर):- खासदार रजनी ताई पाटील यांचा वाढदिवस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी खासदार रजनी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय व बुखारी प्राथमिक उर्दू शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवडीचे असणारे रंग बिरंगी व टिकाऊ शिवणावळीचे मास्क तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वाटप करण्यात आले.

    यावेळी सदरील मास्क वाटपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कोविड १९ व ओमिमायक्रोन विषाणूच्या संधर्भात जनजागृती व आरोग्याविषयी माहिती देण्यात आली.कार्यक्रमादरम्यान खा .रजनी पाटील यांच्या राजकीय वाटचाल व दीर्घायुश्यासाठी विद्यार्थी व शिक्षक संचालक मंडळाने ईश्वराकडे प्रार्थना रुपी साखडे घातले . यावेळी तालुका काँग्रेसचे नेते नगरसेवक नारायण होके ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड.इनामदार , जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे,शेख अहमद ,शेख रशीद ,अफरोज तांबोळी,सतीश पटाईत ,दादा मनुरकर सह शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक उपस्थित होते.