वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी विवेक कुचेकर

    34

    ✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

    बीड(दि.5डिसेंबर):- तालुक्यातील चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गोरगरिब वंचित समुहाच्या सतत सुख दुखात सहभागी होणारे बालाघाटावरील वंचितांचा बुलंद आवाज विवेक (बाबा)कुचेकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.गेल्या आकरा वर्षापासून आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ असलेले भारीप बहुजन महासंघाच्या शहर प्रमुख,बालाघाट विभाग प्रमुख, तालुका अध्यक्ष,जिल्हासहसंघटक, इत्यादी पदे भुषविलेले आहेत.

    तसेच गोरगरिब, शेतकरी ,कष्टकरी , मजुर, ऊसतोड कामगार,बहुजन समाजाच्या विविध प्रश्नावरती सतत आवाज उठवत आंदोलन करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते विवेक (बाबा )कुचेकर यांच्या कार्याची दखल घेवुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश(बाळासाहेब)आंबेडकर यांच्या सुचनेवरून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांनी विवेक(बाबा) कुचेकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड केली आहे
    या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे