निवडणुक येताच अंबाजोगाई चे नगराध्यक्ष यांच्याकडून घोषणांचा पाऊस येऊ शकतो_ राजेश वाहुळे

31

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

अंबाजोगाई(दि.5डिसेंबर):-अंबाजोगाई नगर परिषद च्या वतीने मागील साडेचार वर्षापासून रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यात न आल्यामुळे अनेक गोरगरीब दलित मुस्लीम व अठरापगड जातीचे लोक सत्ताधार्‍यांच्या विरोधात गेले असल्यामुळे लवकरच सत्ताधार्‍यांच्या वतीने आचारसंहितेच्या पुढे पुढे एखादी घोषणा होण्याची दाट शक्यता नाकारली जात नाही पालकमंत्र्यांच्या आदेशाने रमाई घरकुल आवास योजना यामधील भोगवाट्याची आठ रद्द करण्यात येत आहे असे लॉलीपॉप जनतेला प्रभारी नगराध्यक्ष यांच्याकडून देण्यात येऊ शकते असे तरी सध्याच्या वातावरना वरून वाटत आहे.

परंतु प्रभारी नगराध्यक्ष यांनी साडेचार वर्षे एक हाती सत्ता असताना कोणत्याच गोरगरिबांचा विचार न करता ही योजना बारगळत ठेवली त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ही योजना ना राबविल्यामुळे मोठा फटका बसू शकतो असे वाटत आहे त्यामुळे पालकमंत्र्याचे नाव पुढे करून अशी फसवी योजना लवकरच नगरपालिकेच्या वतीने जाहीर होऊ शकते जर असे झाले तर लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने सत्ताधार्‍यांच्या विरोधात आंदोलन केले जाईल साडेचार वर्षात झाले नाही ते चार महिन्यात कसे होईल याचे उत्तर आधी सत्ताधारी राष्ट्रवादी यांना द्यावे लागेल असा सवाल राजेश वाहुळे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष लोकजनशक्ती पार्टी युवा यांनी उपस्थित केला आहे