सुवर्णमहोत्सवी शाळेत महापरिनिर्वाणदिनी ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन

    50

    ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

    धरणगांव(दि. ६ डिसेंबर):-२०२१ सोमवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे महापरिनिर्वाणदिनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर.सोनवणे मॅम होत्या व प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मा.अशोकजी बिऱ्हाडे साहेब होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न , महामानव , परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

    अशोकजी बिऱ्हाडे साहेब यांनी आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही – पेन चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व संपूर्ण स्टाफ च्या वतीने गटशिक्षणाधिकारी बिऱ्हाडे साहेब यांना जन्मदिनानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज हा अनमोल ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर शाळेतील उपशिक्षक व्ही.टी.माळी सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावरील सुंदर गीताचे गायन केले.

    याप्रसंगी महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बिऱ्हाडे साहेबांनी विद्यार्थ्यांशी हितगूज केले. बाबा साहेबांचा जीवनपट सांगितला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिले. सर्वांनी शिक्षण घ्या व मोठे व्हा !… हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक एस.व्ही.आढावे तर आभार एस.एन.कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.