क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेची ” राज्यस्तरीय मातंग मेळावा ” संदर्भात नियोजनात्मक आढावा बैठक संपन्न

  69

  ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

  गेवराई(दि.6डिसेंबर):-क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषद या अग्रणीय सामाजिक संघटनेच्या 20 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जानेवारी 2022 मध्ये संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात ” राज्यस्तरीय मातंग मेळावा ” घेतला जाणार असून यांत राजकीय, सामाजिक, प्रशासकीय व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांना अथवा महिलांना राज्यस्तरीय *समाज गौरव पुरस्काराने* सन्मानित केले असून, राज्यातील सर्व जिल्हे, तालुके व शहर तसेच ग्रामीण भागातील समाजबांधवांची या राज्यस्तरीय मातंग समाज मेळाव्यात मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणार आहे…..

  याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आज शहरातील शासकीय विश्रामगृहात विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नियोजनात्मक आढावा बैठक घेण्यात आली व या बैठकीत संघटनेच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय मातंग मेळाव्यात समाजहिताच्या व समाजन्यायाच्या बाबतीत कोणकोणत्या गोष्टी किंवा उपाययोजना केल्या पाहिजे या विषयांवर सखोल चर्चा करुन नियोजन करण्यात आले व मोठ्या उत्साहात संपन्न होणाऱ्या या राज्यस्तरीय मातंग मेळाव्याच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली. यांमध्ये अध्यक्ष पदी मा.प्रा.डॉ.बाळासाहेब वाल्हेकर यांची तर कार्याध्यक्ष पदी मा.सौ. छायाताई खाजेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

  याच बैठकीत काही पदाधिकाऱ्यांची पदोन्नती तर काहींची नियुक्ती करण्यात आली. यांमध्ये संजय साठे यांची प्रदेश सरचिटणीस पदी, गणेश भालेराव यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी, संजय तुपे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी, कोंडीराम खंदारे यांची मराठवाडा उपाध्यक्ष पदी, नाना कांबळे यांची मराठवाडा उपाध्यक्ष पदी, अनिल दाभाडे यांची शहर-जिल्हा सरचिटणीस पदी, विनोद दणके यांची शहर-जिल्हा उपाध्यक्ष पदी, तर सुनिल दाभाडे यांची युवक आघाडीच्या शहर-जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली…..

  याप्रसंगी क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.उत्तमरावजी कांबळे साहेब, कोअर कमिटी अध्यक्ष मा.प्रा.डॉ.संजय सांभाळकर, प्रदेशाध्यक्ष मा.श्री.प्रमोद कांबळे, प्रदेश महासचिव आनंद शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष मच्छिद्र कांबळे, मराठवाडा अध्यक्ष डॉ.बाळासाहेब वाल्हेकर, प्रदेश उपाध्यक्ष गणेश भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष संजय तुपे, प्रदेश संपर्कप्रमुख प्रा.राजु गोफणे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा छायाताई खाजेकर, कोअर कमिटी कार्याध्यक्षा कल्पना त्रिभुवन, प्रदेश सरचिटणीस संजय साठे, मराठवाडा कार्याध्यक्ष सुरेश घोरपडे, मराठवाडा कार्याध्यक्ष नाना कांबळे, युवक आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष संदीप मानकर, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संतोष नाडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुखदेव कांबळे, युवक आघाडी शहर-जिल्हाध्यक्ष अनुराग वाल्हेकर, सिल्लोड तालुकाध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे, कोंडीराम खंदारे, अनिल दाभाडे, सुनिल दाभाडे, विनोद दणके, भगवान कांबळे, गजानन मानकर, कैलास आहिरे, आदींसहित कार्यकर्त्यांची उपस्थिती होती…. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बाळासाहेब वाल्हेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार संजय साठे यांनी मानले.