महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिस्तबद्ध मार्गाने साजरा

  43

  ?कँडल मार्च विनम्र अभिवादन रॅली

  ✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

  उमरखेड(दि.7डिसेंबर):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहारमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने विनम्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन करण्यात आले.

  तर पंचशील ध्वजाचे अर्धवट ध्वजारोहण एपीआय मा.बनसोड मॅडम, मा.कैलास नेवकर जमादार भारताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर,जानकाबाई इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.शांतिदूत समितीचे अध्यक्ष कुमार केंद्रेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.

  यावेळी शंकरराव दिवेकर, मारुती दिवेकर,भीमराव गवंदे, तुषार पाईकराव,दिलीप कांबळे, संतोष इंगोले,दिलीप मुनेश्वर,शांताबाई दिवेकर, हिराबाई दिवेकर, ज्योतीताई इंगोले, यशोदा दिवेकर, यशोधरा धबाले, लक्ष्मीबाई आठवले, उषाताई इंगोले अजय दिवेकर, नितीन आठवले इत्यादी अनेक तरुण मंडळी व बालक बालिका उपस्थित होते.तर सायंकाळी 7 वाजता वार्ड मधून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या प्रयन्त भव्य कँडल मार्च विनम्र अभिवादन रॅली शिस्तबद्ध पध्दतीने काढण्यात आली.

  यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ठाणेदार मा.अमोल माळवे आणि मा.सुभाषराव दिवेकर मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यामध्ये हजारो भीम अनुयायी बालक,बालिका, तरुण मंडळी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड) यांनी केले तर आभार प्रफुल दिवकर (युवा अध्यक्ष) यांनी मानले.