सा.बां.कार्यालय बनले जुगाराचा अड्डा.!

    35

    ?रिकाम्या वेळात करणार तरी?? हे जुगार खेळणारे कोण…

    ✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

    गडचिरोली(दि.7डिसेंबर):-येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कार्याकडे हेतुपुरसपर दुर्लक्ष होत असल्याने कार्यरत कर्मचारी अतिशय सुस्तावलेल्या अवस्थेत पडलेले असल्याचे चित्र समोर आले आहे. या कार्यालयातील अनेक कर्मचारी कार्यालयीन कामापेक्षा, जुगार खेळण्यात आणि आपले मनोरंजन करण्यासाठी जुगार खेळण्यात आपला कार्यलयीन वेळ घालवण्यात मग्न दिसत आहे.

    याला जबाबदार कोण आहे तरी कोण?? असे अनेक प्रश्न आता अनेकापुढे उपस्थित होताना दिसत आहे या वरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर अनेकविध प्रश्नचिन्ह निर्माण होतांना दिसत आहे. अश्या बेजबाबदार व निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर सबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे..