विनायक विज्ञान महाविद्यालयामध्ये तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे यशस्वी आयोजण

23

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.7डिसेंबर):-प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नेहरू युवा केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नेहरू युवा केंद्र संघटन , मिनिस्ट्री ऑफ यूथ अफैर अँड स्पोर्ट गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन दिनांक १ डिसेंबर २०२१ महाविद्यालयीन परिसरात सकाळी ११;३० वाजता करण्यात आले होते .स्पर्धेचा विषय “राष्ट्रभक्ती एवं राष्ट्र निर्माण – सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास” होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ. अलका भिसे , प्राचार्य, विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर , प्रमुख अतिथी डॉ. सुचिता खोडके ,IQAC समन्वयक, स्पर्धेचे परीक्षक माननीय डॉ. प्रिती देशमुख ,गणित विभाग प्रमुख ,श्री राजीव तायडे,सहायक प्राध्यापक इंग्रजी विभाग, लाभले होते. स्पर्धेची सुरवात दीप प्रज्वलन आणि संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यार्थ्यांना या स्पर्धेचे महत्व आणि नियम सांगितल्यानंतर पूनम जयस्वाल बी.कॉम भाग १ च्या विद्यार्थिनी पासून स्पर्धेची सुरवात झाली .समीर पोपळघाटे ,आदिबा खान ,अश्विनी तिरमारे ,रुपाली ढोरे कार्तिक चावट ,प्रथमेश हंबर्डे ,निकिता गोर्डे ,अक्षदा धंदरे ,लोकेश मारोटकर या विद्यार्थ्यांनी आपली मते अत्यंत उत्कृष्ट आणि हृदयभेदी शब्दामध्ये मांडली. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३ उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पुढच्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे .

कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय डॉ. अलका भिसे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित केले आणि अशा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगिक विकास होईल असे सांगितले. सहभागी झालेल्यांचे अध्यक्षांनी कौतुक केले . नेहरू युवा केंद्र अमरावती येथील प्रतिनिधी श्री गौतम देवघडे ,विशाल नाईक आणि पियुष फुललाखे उपस्थित होते .महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.