शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी युद्धजीत पंडित यांची निवड करा -उज्वल सुतार

    46

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    बीड जिल्हा शिवसेना प्रमुख पद स्थगित झाल्यानंतर नवनिर्वाचित बीड जिल्हा शिवसेना प्रमुख पदी गेवराईचे दबंग नेते यूद्धजीत दादा पंडित यांची निवड करून जिल्ह्यातील शिवसैनिकाला ताकद देण्यासाठी न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपतालुकाप्रमुख उज्वल भैय्या सुतार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

    सविस्तर असे की बीड जिल्हा शिवसेना प्रमुख पदावर स्थगिती आली असून जिल्हा प्रमुख पदासाठी रस्सीखेच लागली आहे जिल्ह्यातील शिवसैनिक युवासैनिक यांना ताकद देण्यासाठी दबंग चेहरा म्हणून बीड जिल्हा सभापती युद्धजित दादा पंडित बीड जिल्ह्याची शिवसेना पदासाठी मागणी शिवसैनिक करत आहे.तसेच बीड जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघात युद्धजित पंडित यांची ओळख असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

    येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला व शिवसैनिकांना सत्तेत आणण्यासाठी त्यांच्या संघटन अनुभव व कार्यपद्धतीचा निश्चित पणे फायदा होइल त्यामुळे यूद्धजीत पंडीत यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करावी.अशी मागणी उज्वल भैय्या सुतार यांनी केली आहे.