भगवती देवी विद्यालयात, डॉ. आंबेडकरांना अभिवादन

    39

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

    उमरखेड(दि.6डिसेंबर)सोमवारला सकाळी ठीक 11 वा. भगवती देवी विद्याल, देवसरी च्या भव्य प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे तर प्रमुख अतिथी पवन वाडेकर जेवली यांनी अतिथी स्थान ग्रहण केले.प्रथमता मान्यवरांच्या हस्तेडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

    या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रकाशराव कदम, दिनेशकुमार वान्नरे, दिगंबरराव माने गणेशराव शिंदे ,अनिल कुमार अल्लडवार, भागवतराव कबले, सचिनभाऊ माने, अरविंद चेपुरवार, मारुती महाराज पुरी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम सोहळा अतिशय आनंदात पार पडला विशेष म्हणजे सर्वांनी करुणा चे नियम पाळले.