मोर्शी येथील रुग्णावर मुंबई येथे ३ लक्ष ५० हजार रुपयांची मोफत शस्त्रक्रिया !

    37

    ?आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे पवार कुटुंबाला मिळाला दिलासा !

    ✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

    मोर्शी(दि.7डिसेंबर):- येथील आप्पासो मधुकर पवार यांना पोटाच्या आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी ३ ते ४ लाखांचा खर्च येणार असल्याचे कळताच त्याच्या साधारण परिस्थितीतील कुटुंबावर आभाळ कोसळले. आजाराच्या चिंतेने दु:खी झालेल्या या कुटुंबाच्या हाकेला आमदार देवेंद्र भुयार धावून गेले वर्षभरापासून पोटदुखीचा आजार सहन करणा-या आप्पासो मधुकर पवार रा गेडाम पुरा मोर्शी यांच्या पोटाच्या गाठीचे ऑपरेशन आमदार देवेंद्र भुयार यांच्यामार्फत ३ लक्ष ५० हजार रुपयांची मोफत पेनक्रिया शस्त्रक्रिया हिंदुजा हॉस्पिटल माहीम मुंबई येथे करण्यात आली.

    मोर्शी येथील आप्पासो मधुकर पवार यांना वर्षभरापासून पोटदुखीचा विकार होता. त्यामुळे यांनी खाजगी दवाखान्यात धाव घेतली. तेथे पोटात गाठ असल्याचे निदान झाले. तसेच ती गाठ त्वरित काढण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला; परंतु ही महागडी शस्त्रक्रिया मोलमजुरी करणा-या या आप्पासो पवार यांच्या कुटुंबास परवडणारी नव्हती. याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांना मिळताच त्यांनी आप्पासो पवार यांना तात्काळ हिंदुजा हॉस्पिटल माहीम मुंबई येथे ऍडमिट करून पोटाच्या गाठीचे ऑपरेशन आमदार देवेंद्र भुयार यांच्यामार्फत ३ लक्ष ५० हजार रुपयांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे पवार कुटुंबाला दिलासा मिळाल्यामुळे पवार कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.